---Advertisement---
जळगाव जिल्हा

शेतकऱ्यांच्या भूसंपादनावरून आमदार चंद्रकांत पाटीलांचा सरकारला घरचा आहेर, दिला थेट इशारा..

new project (16)
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । इंदोर-हैदराबाद महामार्गासाठी मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादित करण्यात आल्या. मात्र त्याला पुरेसा मोबदला देण्यात आला नसल्याने शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी महायुतीला सरकारला घरचा आहेर देत थेट इशारा दिला आहे. यामुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

new project (16)

जमिनीचा समाधान कारक मोबदला मिळाला नसल्याने आ. चंद्रकांत पाटील हे शेतकऱ्यांच्या समवेत रस्त्यावर उतरले असून महामार्गाचे काम बंद पाडले. पुरेसा मोबदला जो पर्यंत दिला जात नाही तो, पर्यंत प्राण गेला तरी चालेल पण आपण मागे हटणार नाही असा इशारा सरकारला दिल्याने राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे

---Advertisement---

यावेळी शेतकऱ्यांच्या समवेत राष्ट्रवादीचे नेते आ एकनाथ खडसे हे देखील उपस्थित झाल्याने सत्ताधारी आणि विरोधीआमदार एकाच आंदोलनात सहभागी झाल्याचं पाहायला मिळाले आहे. मागील काळात शेतकऱ्यांना ज्या प्रमाणात भू संपादनाचा मोबदला देण्यात आला त्याच पद्धतीने यावेळी तो देण्यात यावा अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली आहे. जो पर्यंत शेतकऱ्यांना पुरेसा मोबदला सरकार देत नाही, तो पर्यंत आपले आंदोलन सुरूच राहणार असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटल आहे

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---