⁠ 
शुक्रवार, मे 17, 2024

मिशन बिबट्या : वनविभागाने चोरगाव रस्त्यावर लावला पिंजरा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ फेब्रुवारी २०२२ । गेल्या महिन्याभरापासून तालुक्यातील चोरगाव शिवारात बिबट्याने धुमाकूळ घातला असून येथील नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याच्या सतत वावरामुळे शेतकऱ्यांसह मजुरांमध्ये बिबट्यांची दहशत निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर चोरगाव ते देवगाव रस्त्यावर पिंजरा लावला आहे.

सोमवारी चोरगाव येथे मंगल सोनवणे यांच्या गोठ्यात बिबट्याने वासराचा फडशा पाडला. यापूर्वी २७ जानेवारीला चोरगाव येथे दोन वासरे बिबट्याने फस्त केली होती. आव्हाणी येथे ८ दिवसांपूर्वी गुरांवर हल्ला केला होता. सतत घडत असलेल्या घटनांमुळे नदीकाठावरील चोरगाव, नंदगाव, देवगाव, फुकणी, नारणे, आव्हाणी, दोनगाव येथील शेतकरी भयभीत झालेे आहेत. वनविभागाने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी जि.प.सदस्य प्रताप पाटील यांनी केली. त्यानुसार मंगळवारी पिंजरा लावला.

याप्रसंगी जि.प. सदस्य पाटील, विवेक देसाई, सरपंच ज्ञानेश्वर सोनवणे, जंगू सोनवणे, काशिनाथ सोनवणे, अनिल पवार, मच्छिंद्र सोनवणे, मस्तान शाह उपस्थित होते.

हे देखील वाचा: