⁠ 
रविवार, एप्रिल 28, 2024

जळगाव जिल्हा पुन्हा हादरला! धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नंतर डोक्यावर दगडाने वार

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ ऑगस्ट २०२३ । जळगाव जिल्ह्यात सध्या गुन्हेगारी वाढताना दिसत असून अशातच जळगाव जिल्ह्याला हादरवून सोडणारी एक भयंकर घटना समोर आलीय. एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला आहे. रक्तबंबाळ अवस्थेत पीडितेने नराधमाच्या तावडीतून सुटका करून घेत जीव वाचवला. ही घटना पारोळा तालुक्यात घडली असून या घटनेत गंभीर जखमी असलेल्या पीडित मुलीला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी संशयित तरुण बारक्या उर्फ अशोक मंगा भिल (२२) याच्या विरोधात पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे नेमकी घटना?
पारोळा तालुक्यातील गावातील १४ वर्षीय मुलगी आई तसेच भावासह वास्तव्यास आहेत. एका शेतातील पत्र्याच्या खोलीत सर्व कुटुंब राहत असून मजुरी करत उदरनिर्वाह भागवतं. पीडित मुलगी सायंकाळी गावाबाहेर असलेल्या नदीपात्राजवळ शौचासाठी गेली होती. या वेळी बारक्याने तिला ठार मारण्याची धमकी देत अत्याचार केला.

यादरम्यान या अत्याचारास मुलीने विरोध केला असता बारकु याने पिडीत मुलीच्या डोक्यात दगड टाकला. त्यानंतरही दोरीने तिचा गळा आवळला. मुलीने कशीबशी त्याच्या तावडीतून सुटका करत रक्तबंबाळ अवस्थेत घराकडे धाव घेत घडलेला प्रकार आपल्या कुटंुबाला सांगितला.

कुटुंबियांनी तातडीने अल्पवयीन मुलीला सुरुवातीला पारोळा येथील रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पीडित मुलीला धुळे शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या घटनेनंतर पीडितेच्या भावाच्या फिर्यादीवरुन बारक्या उर्फ अशोक मंगा भिल याच्याविरुध्द अत्याचारासह प्राणघातक हल्ला अशा वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित बारक्याला भिल याला पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ अटक केली आहे.
वडिलांचं छत्र हरपलं, भेळची गाडी चालवत भरतीचा सराव; माऊलीच्या कष्टांचं चीज करत ‘अग्निवीर भाऊ’ सैन्य दलात!

घटनेनंतर संतप्त पीडित मुलीच्या कुटुंबियासह समाजबांधवांसह ग्रामस्थांनी आरोपीला फाशी द्यावी, या मागणीसाठी पारोळा पोलीस स्टेशन गाठून ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर समाज बांधवानी महामार्गावर काही वेळ रास्ता रोको आंदोलन करुन आरोपीला फाशी द्या, नाहीतर आरोपी आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी केली.