जळगाव लाईव्ह न्यूज । ३ नोव्हेंबर २०२२ । अल्पवयीन मुलीला मैत्रीच्या बहाण्याने फोटो स्टुडिओत नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना भुसावळ शहरात उघडकीस आली. या प्रकरणी संशयीत राज लोणारी (भुसावळ) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
फोटो स्टुडिओत नेत केला अत्याचार
15 वर्षीय पिडीतेच्या तक्रारीनुसार, संशयीत राज लोणारी यांनी यावल रोडवरील तापी नगरातील फोटो स्टुडिओत तरुणीला मैत्रीच्या बहाण्याने नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले तसेच त्याचे फोटो मोबाईलमध्ये काढले व मैत्री कायम न ठेवल्यास फोटो व्हायरल करण्याची धमकी देत सतत अत्याचार केला तसेच पीडीतेच्या आई-वडिलांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तपास सहाय्यक निरीक्षक विनोदकुमार गोसावी करीत आहेत.