पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या दोन्ही पुत्रांनी वेधले लक्ष, मतदारसंघात झंझावाती प्रचार..

ऑक्टोबर 31, 2024 9:43 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ ऑक्टोबर २०२४ । जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार गुलाबराव पाटील यांच्या प्रचारार्थ त्यांचे दोन पुत्र हे शेकडो युवकांना सोबत घेवून गावो- गावच्या प्रत्येक गल्लीतून प्रचार करीत आहेत. “गुलाबराव पाटील हे केवळ आमचे वडील नाहीत, ते या मतदार संघाचे भूमिपुत्र असून त्यांनी केलेल्या विकास कामांसाठी आपले आशीर्वाद व खंबीर साथ द्यावी अशी भावनिक साद हे भाऊ जनतेला घालत आहेत. विकासाच्या ध्येयाशी जोडलेली ही भावनिक साद मतदारांच्या हृदयात नवी उर्जा आणि नवीन अशा निर्माण करत असल्याचे प्रत्येक गावातून जनतेच्या मिळालेल्या दिसून येत आहे.

pracharGP 1

मंत्री गुलाबराव पाटील यांचे पुत्र, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील व लघुउद्योजक विक्रम पाटील या दोन भावांचा तीन दिवसात चांदसर, दोनगाव बु., टहाकळी, आव्हाणी, भोकणी, पथराड बु. पथराड खु., लाडली, फुलपाट, पाळधी बु., पाळधी खु.,धार, शेरी, कवठळ, दुसखेडा, एकलग्न, पोखरी तांडा, दोनगाव खु. झुरखेडा, निमखेडा, तारखेडा सह इतर २२ गावांमध्ये झंझावाती प्रचार करून मतदारांशी संवाद साधला. यावेळी मतदारांनी गुलाबराव पाटील यांना आशीर्वाद देऊन भक्कम पाठबळ असल्याची ग्वाही दिली.

धनुष्यबाण व गुलाबराव पाटील व नेत्यांचे लहान मोठे कट – आउट, भगवे रुमाल, टोप्या व मुखवटे यांचा उपयोग केल्याने प्रचार रॅलीत युवकांचा उत्साह व जनतेचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात दिसून येत होता. प्रचार रॅलीमध्ये पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now