---Advertisement---
जळगाव जिल्हा

पांडुरंगाच्या कार्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही; पालकमंत्री गुलाबराव पाटील

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ ऑगस्ट २०२४ । गाव लहान आहे की मोठे यापेक्षा गावाची गरज पाहून निधी दिला आहे. माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येकाचे पक्ष विरहित काम करण्याचा सतत प्रयत्न करत असतो. प्रत्येक गावातील तळागाळातील जनतेशी असलेली नाळ कधीही तुटू दिली नाही. ग्रामपंचायत कार्यालय व निमगाव गावाजवळील पुलालागत संरक्षक भिंतीचे काम मंजूर करून लवकरच सुरु करणार आहे. पांडुरंगाच्या कार्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नसून सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे पाणीपुरवठा व स्वछता विभागाचे मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली. ते निमगाव येथे काल झालेल्या सामाजिक सभागृहाच्या भूमिपूजन प्रसंगी बोलत होते.

GP nimgaon

यावेळी श्री विठ्ठल मंदिर आवारात गौण खनिज अंतर्गत मंजूर केलेले सामाजिक सभागृह बांधकामाचे भूमिपूजन विधिवत पूजा करून जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी निमगावचे नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच अक्षय पाटील, , उपसरपंच शोभाताई धनगर, ग्रामपंचायत सदस्य भूषण पाटील, आशाताई धनगर, मंगल भिल तसेच भजनी मंडळाचा यांचा शाल श्रीफळ देवून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सरपंच अक्षय पाटील यांनी गावात सुरू असलेल्या विविध विकास कामांची माहिती विषद केली. सूत्रसंचालन कृषी सहायक सचिन बाविस्कर यांनी केले तर आभार लोकनियुक्त सरपंच अक्षय पाटील यांनी मानले.

---Advertisement---
image 47
पांडुरंगाच्या कार्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही; पालकमंत्री गुलाबराव पाटील 1

टाळ मृदंगाच्या गजरात पालकमंत्र्यांचे स्वागत
गावांत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आगमन होताच फटाक्यांची आतिष बाजीत, टाळ मृदंगाच्या गजरात व पांडुरंगाच्या नाम घोषाने गावातून दिंडी मिरवणूक काढत स्वागत करण्यात आले. या प्रसंगी महिलांनी पालकमंत्र्याचे औक्षण केले. शाल श्रीफळ व बुके देऊन ग्रामपंचायत, श्री. विठ्ठल भजनी मंडळ व ग्रामस्थांनी मंत्री गुलाबराव पाटील यांचा असा सत्कार केला.

image 48
पांडुरंगाच्या कार्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही; पालकमंत्री गुलाबराव पाटील 2

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील , विभाग प्रमुख युवराज पाटील , लोकनियुक्त सरपंच अक्षय पाटील, उपसरपंच शोभाताई धनगर, ग्रामपंचायत सदस्य भूषण पाटील, अनिताताई धनगर , अंकुश भिल , पोलीस पाटील योगेश महाजन, प्रवीण पाटील, कृष्णा पाटील, हेमंत धनगर, प्रशांत धनगर, जगदीश महाजन, सोपान पाटील, नाशिराबादचे माजी सरपंच विकास पाटील, शहर प्रमुख विकास धनगर , चेतन बर्हाटे, चंदू भोळे, हायस्कूलचे चेअरमन योगेश पाटील, , भजनी मंडळाचे दिलीप पाटील, गणूदास महाजन , ज्ञानदेव पाटील, उखर्डू महाजन, बेळीचे ग्रा.प. सदस्य संजय नाले, मधुकर नाले, पोलीस पाटील दिनेश पाटील, आशुतोष पाटील , प्रमोद राजपूत यांच्यासह निमगाव, बेळी, भागपुर व नाशिराबादचे पदाधिकारी , ग्रामस्थ, भजनी मंडळ व महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---