संजय राऊतांना अतिरेकी म्हणत मंत्री गिरीश महाजनांची सडकून टीका ; नेमकं काय म्हणाले वाचा..

मे 16, 2025 1:54 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मे २०२५ । गुजरात दंगलीप्रकरणी नरेंद्र मोदी हे एक आरोपी होते. त्यावेळी शरद पवारांमुळे मोदींची अटक टळली, तर गुजरातमधून तडीपार असलेल्या अमित शाहांनाही बाळासाहेब ठाकरेंनी मदत केल्याचा खळबळजनक दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकातून केला आहे. पण त्यांच्या या दाव्यांवर भाजप नेते, मंत्री गिरीश महाजन यांनी संजय राऊतांवर सडकून टीका केली आहे. तसेच राऊत यांचे दावे महाजन यांनी फेटाळून लावले आहेत.

mahajan raut

संजय राऊत यांच्या बद्दल काय बोलावं? ते काय बोलतात आता ते कोणी ऐकत सुद्धा नाही. वाटेल तसे ते फालतू बडबड करत बाळासाहेबांनी मोदी आणि शाह यांना मदतीचा हात दिला असेल तर चांगलंच आहे. आम्ही आता खऱ्या शिवसेनेसोबत आहोत. आधी पण शिवसेनेसोबत होतो आणि आता सुद्धा खऱ्या शिवसेने आजही सोबत आहोत.

आजही आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांसोबत आहोत. आम्ही काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलेल्या शिवसेनेसोबत नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली देणाऱ्या शिवसेनेसोबत आम्ही नाही. पण त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली दिली आहे. आज त्यांची परिस्थिती काय झाली आहे. त्यामुळे त्यांना रोज सकाळी अशी बडबड करावे लागते, अशी टीका महाजन यांनी केली.

युद्ध सुरू असताना संपूर्ण देश हा मोदींच्या पाठीशी उभा असताना, सैन्याच्या पाठीशी उभा असताना त्यावेळी मोदींनी राजीनामा द्यावा, अमित शहा यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राऊत करत होते. सैनिकांबद्दल काहीही बोलत होते. आता आपण त्या अतिरेक्यांशी लढावं की देशांतर्गत असलेल्या या अतिरेक्यांशी लढावं? असा सवालही त्यांनी केला. संजय राऊत यांना अतिरेकी म्हणत मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment