---Advertisement---
जळगाव जिल्हा राजकारण

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री महाजनांचं मोठं विधान

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ सप्टेंबर २०२४ । आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी एक मोठं विधान केलं आहे. विशेष त्यांनी माजी मंत्री एकनाथ खडसे यांना ओपन चॅलेंज दिलं आहे. विधानसभा निवडणुकीत मला पाडायचा असेल तर जामनेरला मुक्कामी राहा आणि मला पाडून दाखवा…असं चॅलेंज दिलं आहे.

girish mahajan 1 jpg webp webp

हा जामनेर तालुका आहे काही भाषण करा इथे तुमची डाळ शिजणार नाही… विकास कामांची स्पर्धा करा तुम्ही मंत्री असताना काय केला आणि मी माझ्या मतदारसंघात काय विकास काम केले, असंही मंत्री महाजन म्हणाले. जामनेरमध्ये पार पडलेल्या भाजपच्या बैठकीच्या सभेत ते बोलत होते.

---Advertisement---

स्वतःची ग्रामपंचायतही जिंकू न शकणारे खडसे यांनी जामनेरच्या विकासावर बोलू नये. मी मी म्हणणारे एकनाथ खडसे यांचं आता काय राहिलं आहे? त्यांच्याकडे जिल्हा बँक राहिले नाही जिल्हा दूध संघ राहिला नाही. आमचे मंगेश चव्हाण मुक्ताईनगरला गेले आणि मंदा खडसे वहिनी यांना निवडणुकीत हरवलं. जेव्हा आपण अहंकार करतो, गर्व करतो. सर्व माझ्यामुळे माझ्यामुळे असं करतो तेव्हा कसं गर्व हरण होतं. हे आपल्या लक्षात आले असेल, असं गिरीश महाजन म्हणाले.

तुम्ही काय कारनामे केले हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे जेलमध्ये जावं लागलं.. त्यांचा जावई दोन वर्ष जेलमध्ये जाऊन बसला. तुम्ही मला कधी दारू पिताना पाहिला आहे का? सांगितलं तर कोणीही असेल, असं त्यांनी म्हटलं.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---