जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मार्च २०२२ । मुंबई येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक नुकतीच संपन्न झाली. यावेळी अध्यक्षस्थानी समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ होते.

जळगाव येथे होणाऱ्या माळी साम्राज्य आयोजित राज्यस्तरीय मेळावा पोस्टरचे प्रकाशन मंत्री भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भुजबळ यांनी या उपक्रमाचे कौतुक करत आयोजकांना शुभेच्छा दिल्या व कार्यक्रमाला भुजबळ उपस्थित राहतील असे आश्वासन देखील दिले.समाजात बेरोजगारीचे प्रमाण वाढले असून प्रत्येक घटक हा नोकरीकडे वळत असल्याने व नोकरीचेच प्रमाण कमी असल्याने तरुण हा बेरोजगारीच्या विळख्यात लटकत असतो तरी या मेळाव्याच्या माध्यमातून तरुणांना उद्योग व्यवसाय निर्माण करण्याची सुवर्णसंधी तर उद्योजकांना आपल्या व्यवसायाची वृद्धी वाढवण्याची सुवर्णसंधी मेळाव्याच्या माध्यमातून नक्कीच मिळेल

यावेळी माजी खासदार समीर भुजबळ व माजी आमदार पंकज भुजबळ यांनी देखील उद्योजक मेळाव्याचे पोस्टरचे अवलोकन केले. यावेळी जळगाव जिल्ह्याचे समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष सतीश महाजन जिल्हा कार्याध्यक्ष वसंत पाटील, युवा जिल्हाध्यक्ष भूषण महाजन, युवक जिल्हा कार्याध्यक्ष सुरेंद्र महाजन, अभिलाषा रोकडे राजू महाजन यासह समता सैनिक उपस्थित होते.







