जळगाव जिल्हा

पावसाबाबत हवामान खात्याने वर्तविला हा अंदाज; जळगाव जिल्ह्यात कशी असेल पावसाची स्थिती?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ ऑगस्ट २०२२ । महाराष्ट्रात जून महिन्यात उघडीप दिल्यानंतर जुलै आणि ऑगस्टमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. यामुळे जनजीवन विस्कळित झालेलं पाहायला मिळाले. दरम्यान, सध्या पावसाने उघडीप दिली असली तरी येत्या चार-पाच दिवसांमध्ये जिल्ह्यात दमदार पाऊस होण्याची शक्यता असल्याचे भाकीत हवामान खात्याने वर्तविले आहे.

हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार येत्या चार-पाच दिवसांमध्ये उत्तर महाराष्ट्रात विशेषत: जळगाव जिल्ह्यात पाऊस पुन्हा सक्रिय होऊ शकतो. यादरम्यान राज्यातील काही भागात देखील पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रासह मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे.
जून महिन्यात उघडीप दिल्यानंतर राज्यात पावसाने जुलैच्या सुरुवातीलाच जोरदार हजेरी लावली होती. यादरम्यान राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. यामुळे जनजीवन विस्कळित झालेलं पाहायला मिळाले. सोबत शेतकऱ्यांचे देखील मोठे नुकसान झाले. त्यानंतर काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर राज्यात ऑगस्टमध्येही पावसाने दमदार हजेरी लावली.

मागील गेल्या दहा बारा दिवसापासून राज्यात अनेक भगत पावसाने उघडीप दिली. मात्र अशात आता राज्यात पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. श्रावणात पावसाची हजेरी रिमझिम होती. पुढील महिन्यात पाऊस पुन्हा जोर पकडण्याची शक्यता आहे.

Related Articles

Back to top button