नदीत गेलेल्या म्हैसला पाण्यातून काढताना तरुण बुडाला ; यावल तालुक्यातील घटना

मार्च 19, 2024 3:00 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ मार्च २०२४ । यावल तालुक्यातील अंजाळे गावातील तरुणाचा नदीत गेलेल्या म्हैसला पाण्यातून बाहेर काढताना पाय घसरून खोल पाण्यात बुडून मृत्यू झाला. सुनील दिलीप बादशाह (वय ३०) असे मृत तरुणाचे नाव असून याबाबत यावल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

anjale news jpg webp

याबाबत असे की, अंजाळे गावातील रहिवासी सुनील दिलीप बादशाह काल सोमवारी सायंकाळी मोर नदीच्या पात्राजवळ गुरे चराईसाठी गेला होता. मोर नदीपात्रात शेळगाव बॅरेजच्या बॅकवॉटरकडे एक म्हैस गेली. त्या म्हशीला पाण्यातून बाहेर काढत असताना सुनील याचा तोल गेला आणि तो पाण्यात पडला. खोल पाण्यात पडल्याने त्याला बाहेर निघता न आल्याने तो बेपत्ता झाला. हा प्रकार सोबत असलेल्या गुराख्यांच्या निदर्शनास आला असता त्याने गावात याबाबत माहिती दिली.

यानंतर नागरिकांनी पोहणाऱ्यांच्या मदतीने सुनील बादशाह याला पाण्यातून बाहेर काढले आणि यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले. रुग्णालयात डॉ. तुषार सोनवणे यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात भरत बादशहा यांनी दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत सुनीलच्या पश्चात आई-वडील, पत्नी, तीन वर्षाचा मुलगा, सात महिन्याची मुलगी असा परिवार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now