जळगावसह महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा ; हवामान खात्याकडून अलर्ट जारी

ऑगस्ट 23, 2024 5:16 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑगस्ट २०२४ । जळगावसह राज्यात पावसाने विश्रांती घेतल्याने तापमानात वाढ होऊन उकाडा वाढला होता. यामुळे राज्यात पुन्हा पाऊस कधी कमबॅक करेल याची आतुरता लागली. अशातच हवामान खात्याकडून राज्यात पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यानुसार आज जळगाव राज्यातील काही जिल्ह्यांना पावसासाठी यलो अलर्ट देण्यात आलाय. आगामी दोन दिवस जळगावला पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

rain5day

हवामान खात्याने आज शुक्रवारी ठाणे, रत्नागिरी, पुणे आणि रायगड जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसासाठी येलो अलर्ट जारी केलाय. जळगाव, नाशिक, नंदुरबार, धुळे, छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती, वाशीम, जालना, बीड, बुलडाणा, यवतमाळ, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये विजांसह तुरळक पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

दरम्यान, जळगाव जिल्ह्याला आज आणि उद्या शनिवारी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यादरम्यान,विजांच्या गडगडाटसह सोबत मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा सुटण्याची शक्यता आहे. आज शुक्रवार जळगाव शहरासह जिल्ह्यातील काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने उकाड्याने हैराण झालेल्या जळगावकरांना दिलासा मिळाला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now