⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

पाचोरा युवासेनातर्फे उद्यापासून सदस्य नोंदणी अभियान

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ एप्रिल २०२२ । पाचोरा युवासेनातर्फे शहरात व ग्रामीण भागात सदस्य नोंदणी अभियान उपक्रम राबवण्यात येणार आहे. शहरात २६ एप्रिल मंगळवार रोजी सकाळी 10 ते 1 यावेळी महाराणा प्रताप चौक व शिवसेना मध्यावर्ती कार्यालयात नोंदणी करण्यात येणार आहे.

सदर नोंदणी ऑनलाइन असल्यामुळे बॅनर वरील QR कोड स्कॅन करून किंवा www.joinyuvasena.com. या लिंक वर जाऊन सदस्य होता येणार आहे. सदस्य झाल्यावर आपल्याला लागलीच आदित्य ठाकरे यांच्या सही चे ओळख पत्र ऑनलाइन डाउनलोड करता येईल. युवासेना ही युवकांच्या प्रश्नांवर काम करणारी, त्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना आहे. युवकांना समाजकारणात संधी देऊन त्यांना व्यक्त होण्यास व्यासपीठ देणारी संघटना, विविध कला कौशल्य, शैक्षणिक उपक्रम राबवणारी संघटना आहे.