जळगाव लाईव्ह न्यूज । १ फेब्रुवारी २०२२ । जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे नवीन सदस्य नोंदणी अभियान नुकतेच सुरू करण्यात आले. जळगाव शहरात प्रत्येक वॉर्डात सदस्य नोंदणी करण्यात येणार असून, काल शहरात काट्याफाईल भागात सदस्य नोंदणी करण्यात आली. जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पाटील यांच्या हस्ते सदर नोंदणी अभियान सुरू करण्यात आले. जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. यावेळी ४५० नवीन सभासद नोंदण्यात आले.

याप्रसंगी महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, सहकार विभागाचे जिल्हाध्यक्ष वाल्मिक पाटील, महिला जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, प्रदेश सचिव इजाज मलिक, अशोक पाटील, मजहर पठाण, कल्पिता पाटील, शिवराज पाटील, अनिरुद्ध जाधव, सुनील माळी, जितू बागरे, डॉ. रिजवान खाटीक, अनिल पवार, विशाल देशमुख यांच्यासहअसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

हे देखील वाचा :
- जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा दि २७ रोजी
- ज्वारी, मका, बाजरीला सरकारचा हमीभाव; जळगाव जिल्ह्यातील ‘या’ १८ ठिकाणी खरेदी केंद्रे..
- आदिवासी बांधवांपर्यंत योजनांची माहिती पोहोचणार; जळगावात ‘सेवा संकल्प अभियान’च्या चित्ररथाचा शुभारंभ
- शिरपूर-चोपडा महामार्गावर भीषण अपघात; मध्यप्रदेशातील चौघांचा जागीच मृत्यू
- गणेशोत्सवात सर्वसामान्यांना दिलासा ! खाद्यतेल स्वस्त करण्यासाठी सरकार उचलणार मोठं पाऊल






