बातम्याजळगाव जिल्हा

प्रवाशांसाठी खुशखबर ! मध्य रेल्वेकडून 18 विशेष गाड्या जाहीर, कुठून कुठपर्यंत धावणार?

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑगस्ट २०२५ । रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. सलग सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने 18 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष यातील काही गाड्या भुसावळमार्गे धावणार आहे.

train jpg webp

मार्गानुसार तपशील

मुंबई – नागपूर मार्ग (6 फेऱ्या)

गाडी क्रमांक 01123/01124 आणि 02139/02140: या गाड्या 9, 10, 15 आणि 17 ऑगस्ट 2025 रोजी मुंबई आणि नागपूर दरम्यान धावणार आहेत.
थांबे: दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा.
डब्यांची रचना:
2 वातानुकूलित तृतीय श्रेणी, 12 शयनयान, 6 सामान्य द्वितीय श्रेणी, 2 गार्ड ब्रेक व्हॅन.

मुंबई – गोवा (मडगाव) मार्ग (4 फेऱ्या)

गाडी क्रमांक 01125/01126 आणि 01127/01128: या गाड्या 14, 15, 16 आणि 17 ऑगस्ट 2025 रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस आणि मडगाव दरम्यान धावतील.
थांबे: ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड.
डब्यांमध्ये वातानुकूलित प्रथम, द्वितीय आणि तृतीय श्रेणी तसेच शयनयान डबे असतील.

मुंबई – कोल्हापूर मार्ग (2 फेऱ्या)

गाडी क्रमांक 01417/01418: ही गाडी 8 ऑगस्ट रोजी मुंबईहून तर 10 ऑगस्ट 2025 रोजी कोल्हापूरहून निघेल.
थांबे: दादर, ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, सातारा, कराड, सांगली, मिरज.
डब्यांची रचना: 2 वातानुकूलित तृतीय श्रेणी, 12 शयनयान, 6 सामान्य द्वितीय श्रेणी.

    पुणे-नागपूर मार्गावरील विशेष गाड्या

    गाडी क्रमांक: 01469/01470 आणि 01439/01440
    धावण्याच्या तारखा: 8, 10, 14, 15, 16, आणि 17 ऑगस्ट 2025 रोजी पुणे आणि नागपूर दरम्यान.
    थांबे: दौंड कॉर्ड लाईन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा.
    डब्यांची रचना: 2 वातानुकूलित तृतीय श्रेणी, 12 शयनयान, 6 सामान्य द्वितीय श्रेणी.

    या विशेष गाड्यांसाठी आरक्षण रेल्वेच्या सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच www.irctc.co.in या संकेतस्थळावर करता येईल. तपशीलवार वेळापत्रक आणि थांब्यांची वेळ जाणून घेण्यासाठी www.enquiry.indianrail.gov.in संकेतस्थळ किंवा NTES अॅप वापरावे.

    चेतन पाटील

    पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

    Related Articles

    Back to top button