तेलाची फोडणी पुन्हा महागली ; खाद्यतेलाच्या किंमतीत वाढ

जुलै 2, 2025 11:15 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २ जुलै २०२५ । काही दिवसापूर्वी केंद्राने कच्च्या तेलावरील आयात शुल्क १० टक्क्यांनी कमी केल्यामुळे सर्वच खाद्यतेलांच्या किंमतीत घसरण झाली होती. पण आता इराण आणि इस्राईलमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा फटका खाद्यतेलाच्या किंमतीवर बसला आहे. तेलाच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे.

oil 2

१५ लिटर तेलाच्या एका डब्यामागे आता ६० रुपये जास्त मोजावे लागणार आहे. शेंगदाणा तेल, सूर्यफूल तेल, पाम तेल, मोहरीचे तेल आणि वनस्पती तूप या सर्वांच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे महिन्याचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खाद्यतेलाच्या किंमतीत वाढ झाली आहे. घाऊक बाजारात सर्व प्रकारच्या खाद्य तेलाच्या किंमतीमध्ये किलोमागे ३ ते ४ रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे १५ लिटरच्या एका तेलाच्या डब्यामागे तुम्हाला ५० ते ६० रुपये अधिक मोजावे लागणार आहे. इराण-इस्राईल युद्धामुळे तेलाचे दर वाढल्याचं बोललं जात आहे.

फक्त शेंगदाणा, सूर्यफूल, मोहरीचे तेल आणि पाम तेलाच्या दरात वाढ झाली नाही तर खोबरेल तेलाच्या दरात देखील वाढ झाली आहे. गोटा खोबऱ्याचे भाव वाढल्यामुळे २५ किलो खोबरेल तेलाच्या डब्याच्या किंमती ६ हजार रुपयांवर पोहचल्या आहेत. तेलांच्या दरात वाढ झाल्यामुळे गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडणार आहे. तेलाची फोडणी महागल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now