---Advertisement---
जळगाव शहर राजकारण

Jalgaon Politics : महापौर संतापल्या.. तुमच्या ढिसाळपणामुळे आम्हाला मान खाली घालायची वेळ आलीय!

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जुलै २०२२ । राज्यातील सत्तांतरनंतर पहिलीच महासभा गुरुवारी जळगाव मनपात पार पडली. गेल्या काही दिवसापासून सत्ताधारी विरुद्ध आयुक्त आणि प्रशासन चित्राचे पडसाद महासभेत पाहायला मिळाले. पावसाळ्याला सुरुवात होऊन देखील शहरातील रस्त्यांची कामे अपूर्ण असल्याने महापौरांसह सर्वच नगरसेवकांना नागरिकांची बोलणी खावी लागत आहेत. दोन दिवसापूर्वी इच्छादेवी ते डी मार्ट रस्त्यावर एक ट्रॅक्टर उलटले होते त्यानंतर एका रिक्षा चालकाने महापौरांना सुनावले होते. वारंवार सूचना देऊन देखील कामे होत नसल्याने आम्हाला मान खाली घालण्याची वेळ येऊन ठेपली आहे असे म्हणत महापौर जयश्री महाजन यांनी महासभेत मनपा अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले.

mahapour 1 jpg webp

जळगाव शहर महापालिकेच्या महासभेचे आयोजन गुरुवारी मनपाच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात महापौर जयश्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. यावेळी उपमहापौर कुलभुषण पाटील, आयुक्त विद्या गायकवाड, नगरसचिव सुनील गोराणे आदी उपस्थित होते. महासभेत एकूण १९ विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. या विषयांसह महासभेत झालेल्या आयत्या वेळच्या विषयांवर महासभा चांगलीच गाजली. राज्यातील सत्तांतर, जळगाव मनपातील बंडखोर नगरसेवकांनी एकनाथ शिंदे गटाला दिलेला पाठिंबा, सत्ताधारी विरुद्ध आयुक्त अशा घडामोडीत आजची पहिलीच सभा पार पडली. महासभेत रस्ते, चिखल व खड्ड्यांच्या प्रश्नावरून चांगलीच गरमागरमी झाली.

---Advertisement---

महासभेत महापौर जयश्री महाजन म्हणाल्या कि, जळगाव शहर मनपात शिवसेनेची सत्ता येऊन वर्ष उलटले आहे. येत्या १० महिन्यांवर महापालिकेची निवडणूक येवून ठेपली आहे. शहरात अमृत योजना आणि भूमिगत गटारीच्या कामामुळे रस्ते खोदण्यात आले होते. मनपा प्रशासनाला अनेकवेळा सूचना देवूनही रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे होत नाही. पावसाळा सुरु झाला असून खड्डे आणि चिखलमुळे नागरिकांचे हाल होत असून नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल नागरिक आम्हाला प्रश्न विचारत आहे. नागरिकांच्या प्रश्नांना उत्तर देऊ शकत नसल्याने आम्हाला मान खाली घालण्याची वेळ आली आहे. नागरिकांच्या प्रश्नांची जाण ठेवून, किमान रस्त्यांची कामे करा अशा शब्दात महापौरांनी मनपा आयुक्तांसह मनपा अधिकाऱ्यांनाही खडेबोल सुनावले आहे.

दोन दिवसापूर्वी इच्छादेवी चौक ते डी मार्ट रस्त्यावर खड्ड्यामुळे एक ट्रॅक्टर उलटले होते. त्यानंतर महापौर जात असताना एक रिक्षा अडकल्याने चालकाने महापौरांची गाडी अडवून त्यांना जाब विचारला होता. महासभेत महापौरांनी अधिकाऱ्यांना खडसावत डीमार्ट ते इच्छादेवी चौकादरम्यानच्या रस्त्यांबाबत महामार्ग प्राधिकरण रस्त्याची दुरुस्ती करेल तेव्हा करेल, मात्र त्याआधी मनपाकडून या रस्त्याची दुरुस्ती करण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या. तसेच मनपा कर्मचाऱ्यांना आपल्या निर्धारीत पाच दिवसांच्या आठवड्यात आपली कामे मार्गी लावता येत नसतील तर आयुक्तांनी शनिवारी व रविवारी थांबून आपल्या कर्मचाऱ्यांकडे अडकलेल्या व थांबविलेल्या फाईलींचा निपटारा करून घेण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या.

महापौर- उपमहापौरांनी सूचना देवूनही प्रशासनाकडून रस्त्यांची दुरुस्ती झाली नाही. प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा फटका नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना बसत असल्याचा आरोप महापौर जयश्री महाजन यांनी केला आहे. जळगाव शहरातील रस्त्यांची कामे लवकरात लवकर पूर्ण करा, अशा सूचना महापौर जयश्री महाजन यांनी दिल्या आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---