महापौर व उपमहापौर निवडीचा कार्यक्रम जाहीर; १८ मार्चला निवडणूक

मार्च 6, 2021 11:35 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ मार्च २०२१ । महापालिकेच्या आगामी अडीच वर्षांच्या कालखंडासाठी महापौर व उपमहापौर निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. महापौर भारती सोनवणे व उपमहापौर सुनील खडके यांचा कार्यकाळ १७ मार्च रोजी संपणार आहे. त्यामुळे येत्या १८ मार्च रोजी नूतन पदाधिकाऱ्यांची निवडणूक होणार आहे.

jalgaon-manapa

अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड होणार आहे. महापौर व उपमहापौर पदासाठी ९ ते १६ मार्च या दरम्यान सुटीचे दिवस वगळता सकाळी ११ ते दुपारी १ वाजता नगरसचिवांकडे नामनिर्देशनपत्र घेता येणार आहेत. १७ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत उमेदवारांना नामनिर्देशनपत्र दाखल करता येईल. अर्जांची छाननी १८ रोजी विशेष सभा सुरू झाल्यानंतर होईल. छाननीनंतर माघारीसाठी १५ मिनिटे वेळ दिला जाणार आहे. एकाच जागेसाठी जास्त अर्ज आल्यास मतदान घेतले जाईल. महापौर निवडीनंतर उपमहापौरांची निवड होणार आहे.

Advertisements

दरम्यान, एकहाती सत्ता असलेल्या भाजपत महापौर व उपमहापौर पदासाठी इच्छुकांची गर्दी वाढत आहे. महिला सर्वसाधारण पदासाठी राखीव असलेल्या महापौरपदासाठी दोन्ही नगरसेविकांनी इच्छा व्यक्त केली आहे. तर उपमहापौरपदासाठी इच्छुकांनी नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. पक्षश्रेष्ठींनी बऱ्याच जणांना आश्वासन दिल्याने ऐनवेळी कोणाचे नाव जाहीर होते याकडे लक्ष लागून आहे.

Advertisements

महापालिकेत शिवसेनेचे संख्याबळ कमी असले तरी भाजपतील अंतर्गत गटबाजीमुळे तापदायक ठरणारी आहे. शिवसेनेकडूनही उमेदवार देण्याची तयारी सुरू आहे. भाजपत इच्छुकांची गर्दी असल्याने नाराजांची मोट बांधन चमत्कार घडवून आणण्याची तयारी शिवसेनेकडून सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे शिवसेनेच्या गळाला किती नगरसेवक लागतात याकडे लक्ष लागून आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now