तीन लाखांसाठी विवाहितेचा छळ; गुन्हा दाखल
जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जानेवारी २०२२ । शहरातील रामेश्वर कॉलनी येथील तुळजामाता परिसरात राहणाऱ्या २२ वर्षीय विवाहितेचा ३ लाखांसाठी छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून पतीसह चार जणांविरोधात एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
पल्लवी किरण शिंदे (वय २२) या विवाहितेस माहेराहून तीन लाख रुपये आणण्याची मागणी करीत सासरच्या लोकांनी छळ केला. १८ एप्रिल २०१९ रोजी पल्लवी यांचे लग्न किरण हरचंद शिंदे (रा. कापुसवाडी ता. जामनेर) यांच्याशी झाले. लग्नाच्या एक महिन्यानंतर पती किरण शिंदे यांनी ‘स्वयंपाक व शेती काम येत नाही असे’ असे टोमणे मारणे सुरू केले. त्यानंतर ट्रॅक्टर घेण्यासाठी माहेराहून तीन लाख रुपये आणावे, या मागणीसाठी सासू, सासरे, जेठ, जेठाणी यांनी त्रास दिला. या प्रकरणी पती किरण हरचंद शिंदे, सासू नर्मदाबाई, सासरे हरचंद किसन शिंदे, जेठ प्रकाश शिंदे आणि जेठाणी आशाबाई यांच्या विरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संजय धनगर तपास करीत आहे.
हे देखील वाचा :
- मुंबई-नाशिक महामार्गावरील भीषण अपघातात अमळनेरच्या दाम्पत्याचा मृत्यू
- सावद्यात लाखो रुपयांचा अवैध गुटखा जप्त; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- जळगावात मांजा विक्रीसह वापर करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई; ८ जण ताब्यात
- Jalgaon : शेतीतून उत्पन्न नाही, कर्जफेडीची चिंता, घरात कोणी नसताना शेतकऱ्याने उचललं धक्कादायक पाऊल
- जळगावात नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या दोन युवकांवर गुन्हा दाखल