जळगाव लाईव्ह न्यूज । २० मे २०२२ । सासऱ्यांना लकवा झाल्याने उपचारासाठी माहेरहून १ लाख रूपये आणावे, लग्नात आंदण कमी दिल्याच्या कारणावरून विवाहितेचा सासरी छळ झाला. याप्रकरणी जॉयसी दीपक जेम्स (रा.हरदा, मध्य प्रदेश) या विवाहितेच्या फिर्यादीवरून पती, नणंद विरूद्ध भुसावळ शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला.
गुन्हा दाखल भुसावळ येथील माहेर असलेल्या जॉयसी दीपक जेम्स (वय २०, मूळ रा. हरदा रेल्वे स्थानकाजवळ) या विवाहितेचा १५ मार्च २०२० ते ३० एप्रिल २०२१ या काळात शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. पती दीपक व त्याची बहीण दीपिका हँन्डी जेम्स यांनी तुझ्या वडिलांनी लग्नात कमी आंदण दिले, विवाहिता गर्भवती होती तेव्हा मुलगाच पाहीजे या कारणावरून व सासरे हॅन्डी जेम्स यांच्यावर औषधाेपचारासाठी माहेरहून एक लाख रुपये आणावे म्हणून छळ केला. पैस न आणल्यास घरात राहू देणार नाही, अशी धमकी दिली. शिवीगाळ, मारहाण करून त्रास दिला. या प्रकाराला कंटाळून महिलेने भुसावळ शहर पोलिस ठाण्यात पती दीपक व नणंद दीपिका यांच्याविरुध्द स्त्री अत्याचार, हुंडा प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. सहायक फौजदार संजय कंखरे तपास करत आहे.