५० हजारासाठी विवाहितेचा छळ; चार जणांविरोधात गुन्हा दाखल
जळगाव लाईव्ह न्यूज । ०३ डिसेंबर २०२१ । सोयगाव येथे लग्न झालेल्या विवाहितेला ५० हजारासाठी पतीसह सासरच्या मंडळींकडून छळ केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून २ डिसेंबर रोजी एमआयडीसी पोलीसत पतीसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
सविस्तर असे की, शहरातील अयोध्यानगर येथील माहेर असलेल्या ज्योतीबाई संतोष गाडेकर (वय-३०) यांचा विवाह संतोष दत्तू गाडेकर रा. सोयगाव ता. औरंगाबाद यांच्याशी रितीरिवाजानुसार २००९ मध्ये झाला. सुरूवातीचे काही दिवस चांगले गेल्यानंतर पती संतोष गाडेकर यांनी लहान लहान कारणावरून टोमणे मारणे सुरू केले. त्यानंतर माहेरहून ५० हजार रूपये आणावे यांसाठी शरिरीक व मानसिक छळ करण्यास सुरूवात केली. यासाठी सासरे, जेठाणी आणि दिराणी यांनी देखील गांजपाठ केला. हा त्रास सहन न झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या. याबाबत ज्योतीबाई गाडेकर यांनी एमआयडीसी पोलीसात धाव घेवून पतीसह सासरच्यांविरोधात गुरूवारी २ डिसेंबर रोजी दुपारी तक्रार दिली.
त्यांच्या तक्रवारून पती संतोष दत्तू गाडेकर, सासरे दत्तू लक्ष्मण गाडेकर, जेठाणी सीमा संजय गाडेकर आणि दीराणी ललिता विष्णू गाडेकर सर्व रा. सोयगाव ता. औरंगाबाद यांच्याविरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक अतुल पाटील करीत आहे.