⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

जिल्हा बँक निवडणूक : ‘या’ जागांसाठी होणार लढत

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ नोव्हेंबर २०२१ । जळगाव जिल्हा बँक निवडणुकीसाठी सोमवार दि.८ रोजी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. भाजपच्या सर्व उमेदवारांसह १०८ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता जिल्हा बँक निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. एकूण जागांपैकी ११ जागा बिनविरोध झाल्याने केवळ ९ जागांसाठी लढत होणार आहे.

संपूर्ण जिल्हावासियांचे लक्ष लागून असलेल्या जळगाव जिल्हा बँक निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. वैध ठरलेल्या एकूण १५० उमेदवारी अर्जापैकी सोमवार दि.८ रोजी माघारीच्या शेवटच्या दिवशी १०८ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे ४२ उमेदवार आता निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या ४२ उमेदवारांपैकी ११ जागा ह्या बिनविरोध झालेल्या असल्याने केवळ रावेर, यावल, भुसावळ, चोपडा या विविध कार्यकारी सेवा संस्था मतदार संघासह संस्था व व्यक्तिगत सभासद, महिला राखीव, इतर मागासवर्ग प्रवर्ग, अनुसूचित जाती-जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या ९ जागांसाठी दि. २१ नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. एकूण ४२ उमेदवार रिंगणात असले तरी प्रत्यक्षात केवळ ३१ उमेदवारांमध्येच खरी लढत होणार आहे.

११ जागा बिनविरोध
मुक्ताईनगर मतदार संघातून माजी मंत्री एकनाथराव खडसे, अमळनेर मतदार संघातून आ. अनिल पाटील, चाळीसगाव मतदार संघातून प्रदीप देशमुख, धरणगाव मतदार संघातून संजय पवार, एरंडोल मतदार संघातून अमोल पाटील, जळगाव मतदार संघातून महापौर जयश्री महाजन, जामनेर मतदार संघातून नाना पाटील, पाचोरा मतदार संघातून आ.किशोर पाटील, पारोळा मतदार संघातून आ.चिमणराव पाटील, बोदवड मतदार संघातून रवींद्र पाटील, भडगाव मतदार संघातून प्रताप पाटील आदी उमेदवार बिनविरोध झाले आहेत.

या उमेदवारांमध्ये होणार लढत
विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातून मेहताबसिंग नाईक, विकास वाघ, अनुसूचित जाती-जमाती मतदार संघातून शामकांत सोनवणे, प्रकाश सरदार, नामदेव बाविस्कर, इतर मागासवर्ग प्रवर्गातून विकास पवार, माजी आ.डॉ. सतीष पाटील, प्रकाश पाटील, राजीव पाटील, महिला राखीव मतदार संघातून कल्पना पाटील, अरुणा पाटील, ऍड. रोहिणी खडसे-खेवलकर, शैलजादेवी निकम, शोभा पाटील, सुलोचना पाटील, इतर संस्था व व्यक्तिगत सभासद मतदार संघातून माजी आ.गुलाबराव देवकर, प्रकाश पाटील, प्रकाश सरदार, उमाकांत पाटील, रवींद्र पाटील, चोपडा मतदार संघातून घनःश्याम अग्रवाल, सुरेश पाटील, संगीताबाई पाटील, भुसावळ मतदार संघातून आ.संजय सावकारे, शांताराम धनगर, यावल मतदार संघातून विनोदकुमार पाटील, प्रशांत पाटील, गणेश नेहते, रावेर मतदार संघातून अरुण पाटील, जनाबाई महाजन, राजीव पाटील आदी उमेदवारांमध्ये लढत होणार आहे.