⁠ 
सोमवार, ऑक्टोबर 14, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगावच्या विकासासाठी मिळाले २५० कोटी : वाचा आमदार राजूमामा काय म्हणाले ?

जळगावच्या विकासासाठी मिळाले २५० कोटी : वाचा आमदार राजूमामा काय म्हणाले ?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जुलै २०२३ ।  जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाला शिंदे फडणवीस सरकार सत्तेवर आल्यापासून काय मिळाले? असा प्रश्न कित्येकांना पडला आहे. यातच आता शिंदे फडणवीस सरकारमध्ये अजित पवार यांच्या गटाची देखील एन्ट्री झाली आहे. मात्र आनंदाची बाब अशी की, शिंदे – फडणवीस सरकारमुळे जळगाव शहराला तब्बल वर्षभरात २५० कोटींचा निधी मिळाला असल्याचा दावा भाजपाचे आमदार राजुमामा भोळे यांनी केला आहे.(jalgaon city development)

शिंदे फडणवीस सरकार महाराष्ट्रात आल्यापासून महाराष्ट्राची अधोगती होत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. राज्याचे प्रगती होत नाहीये असेही ते म्हणत आहेत. मात्र याची उलटच सध्या जळगाव शहरात पाहायला मिळत आहे. कारण कधी नव्हे तो जवळजवळ अडीचशे कोटींचा निधी हा जळगाव शहराला राज्य सरकारतर्फे मिळाला आहे. असा दावा आमदार राजुमामा यांनी केला आहे.(raju mama bhole on jalgaon city development)

जळगाव शहराला मिळालेला एकुण निधी (आमदारांचा दावा)

अर्थ संकल्पाच्या माध्यमातून जळगांव शहरासाठी ८५ कोटी रुपये निधी रस्ते विकास कामांसाठी निधी
नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रात अधिसुचित विशिष्ट नागरी सेवा व सुविधा पुरविण्यासाठी निधी उपलब्ध करून देणेबाबत योजनेंतर्गत जळगाव शहरातील रस्त्यांसाठी ०५ कोटी रुपये निधी मंजूर.

महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोई सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद योजनेंतर्गत जळगाव शहरातील रस्त्यांसाठी ०५ कोटी रुपये निधी मंजूर.

रस्ते व पूल परिरक्षण व दुरुस्ती कार्यक्रम सन २०२२२३ अंतर्गत रस्ते दुरुस्ती कार्यक्रम जि. जळगाव जळगाव शहरातील इच्छादेवी चौक ते रायसोनी कॉलेज जाणाऱ्या रस्त्यासाठी १० कोटी रुपये निधी मंजूर.

ग्रामविकास व पंचायत राज विभागामार्फत “ सन २०२२-२३ या अर्थी वर्षातील तरतुदीतून मा.लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत मुलभूत सुविधा पुरविणे योजनेंतर्गत ०५ कोटी रुपये निधी मंजूर.

ग्रामविकास व पंचायत राज विभागामार्फत “ सन २०२२-२३ या अर्थी वर्षातील तरतुदीतून मा.लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत मुलभूत सुविधा पुरविणे
नगरविकास विभागामार्फत “नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रात अधिसूचित विशिष्ट नागरी सेवा व सुविधा पुरविण्यासाठी निधी उपलब्ध करून देणेबाबत” योजनेंतर्गत १०० कोटी रुपये निधी मंजूर.

नगरविकास विभागामार्फत “ मनपा क्षेत्रात मुलभूत सोई सुविधांचा विकास” योजनेंतर्गत ०९ कोटी रुपये निधी मंजूर.

नगरविकास विभागामार्फत “महानगरपालिका यांची नव्याने हद्दवाढ झालेल्या भागात नागरी साया सुविधांचा विकास करण्यासाठी विशेष अर्थसहाय्य ” योजनेंतर्गत ०५ कोटी रुपये निधी मंजूर.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मार्फत “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत सन २०२२-२३ या वर्षासाठी जळगाव जिल्ह्यातील कामांना मंजुरी देण्याबाबत” योजनेंतर्गत ०४ कोटी रुपये निधी मंजूर.

वन विभागामार्फत “जळगाव शहरातील लांडोरखोरी येथे ट्रांझीट ट्रीटमेंट सेंटर” उभारणेसाठी ८.८८ कोटी रुपये निधी मंजूर.

प्रदेश पर्यटन विकास योजनेंतर्गत सन २०११-१२ ते सन २०२२-२३ या वित्तीय वर्षात प्रशासकीय मंजुरी दिलेल्या कामांवर बसविण्यात आलेली स्थगिती हटवून जळगाव शहर महानगरपालिका हद्दीतील मेहरूण तालाव परिसर सुशोभिकरण करण्यासाठी ०५ कोटी रुपये निधी मंजूर (४९६.१६ लक्ष)

नगरविकास विभागामार्फत “ मनपा क्षेत्रात मुलभूत सोई सुविधांच्या विकासासाठी विशेष त 1/3 योजनेंतर्गत १० कोटी रुपये निधी मंजूर. नगरविकास विभागामार्फत “महानगरपालिका यांची नव्याने हद्दवाढ झालेल्या भागात नागरी सोयी सुविधांचा विकास करण्यासाठी विशेष अर्थसहाय्य” योजनेंतर्गत १० कोटी रुपये निधी मंजूर.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह