धरणगावात फडकला गुलाबभाऊंचा झेंडा ; ठाकरे गटाचा बहिष्कार

जळगाव लाइव्ह न्यूज । २७ मे २०२३ । धरणगाव कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी शिवसेनेच्या लताबाई गजानन पाटील तर उपसभापतीपदी भाजपचे संजय जुलाल पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. यावेळी कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील ढोल-ताशाच्या गजरावर ठेका धरला. तसेच भाजप-शिवसेना आणि संजय पवार यांच्या गटातला प्रत्येकी एक-एक वर्ष सभापती आणि उपसभापतीपद दिले जाणार असल्याचे ना. पाटील यांनी सांगितले.

gulabrao patil 12 jpg webp

धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पदी शिवसेनेचे तालुकाप्रमुख गजानन नाना पाटील रा. बाभुळगाव यांच्या धर्मपत्नी लताताई गजानन पाटील यांची आज सभापती पदी बिनविरोध निवड करण्यात आली. पंधरा वर्षानंतर दुसऱ्यांदा महिला सभापती झाल्या. तर उपसभापती भाजपाचे संजय जुलाल पवार राहणार वराड यांचे बिनविरोध निवड करण्यात आली. दि.२६ रोजी सकाळी ११वाजता बाजार समितीच्या सभापती उपसभापती निवडीसाठी नूतन संचालकांची विशेष सभा सहाय्यक निबंध विशाल ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. दोघांचे एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची निवड घोषित करण्यात आली.

यावेळी सभापती व उपसभापती यांचे स्वागत शिवसेनेचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, राष्ट्रवादीचे संजय पवार, भाजपाचे पी.सी.पाटील यांनी केले. दुसऱ्यांदा महिलेला संधी व शिवसेनेच्या पहिल्यांदा महिला सभापती झाल्याने अभिनंदन करण्यात आले. शिवसेना भाजपा संजय पवार राष्ट्रवादीचे संचालक उपस्थित होते. त्यात सुनील दत्तात्रय पवार, सुदाम शेनपडु पाटील, किरण शांताराम पाटील रेखाबाई ईश्वर पाटील, ज्ञानेश्वर वसंत माळी, सुरेखा देविदास चौधरी, प्रेमराज परशुराम पाटील, नितीन नंदलाल कर्वा, संजय रमेश काबरा हे उपस्थित होते.
ठाकरे शिवसेना व राष्ट्रवादीच्या निवडणुकीवर बहिष्कार बाजार समितीच्या सभागृहात विशेष सभेत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना व राष्ट्रवादीचे संचालक उपस्थित होते त्यात सुरेश नाना चौधरी, रमेश माणिक पाटील, रघुनाथ धुडकू पाटील, रंगराव दोधु पाटील, रवींद्र भिलाजी पाटील, दिलीप उत्तम धनगर हे, सहा सदस्य सह्याकरून सभापती उपसभापती निवडणुकीपासून तटस्थ राहिले. यावेळेस बोलताना रमेश पाटील म्हणाले की, सभापती उपसभापती निवडणुकीवर आम्ही बहिष्कार टाकला आहे निवडणूक अधिकारी यांनी घोळ केला होता. आमच्या एक उमेदवार तीन मतांनी पराभूत झाला आम्ही रिकाऊंटिंगची मागणी केली होती. पण ती त्यांनी स्वीकारली नाही फेर मोजणी करावी परंतु आमच्यावर अन्याय झाला लोकशाहीच्या आघात आहे. म्हणून आम्ही बहिष्कार टाकला होता.

सभापती उपसभापती निवडणुकीच्या वेळेस शिवसेना भाजपा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यांनी फटाके फोडून जल्लोष केला. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख पी.एम.पाटील, तालुकाप्रमुख गजानन नाना पाटील, विलास महाजन, पप्पू भावे, वासुदेव चौधरी, भैय्या महाजन, बालू जाधव डी.ओ पाटील, विजय महाजन, अभिजीत पाटील, वाल्मीक पाटील, प्रिया इंगळे, रवींद्र कंखरे, सुनील चौधरी प्रेमराज पाटील ,सुभाष पाटील, शरद पाटील, तसेच भाजपाचे पी.सी.आबा पाटील, सुभाष पाटील, संजय महाजन, दिलीप महाजन, कन्हैया रायपुरकर , दिनेश पाटील, ॲड. वसंतराव भोलाणे, चंदन पाटील, गोपाल पाटील, तसेच राष्ट्रवादीचे संजय पवार, रमेश राजाराम पाटील, सुनील पवार आदी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळेस पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता. धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी सचिव नवनाथ तायडे व कर्मचारी यांनी सहकार्य केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now