विवाहितेचा विनयभंग; गुन्हा नोंद

एप्रिल 17, 2022 4:08 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ एप्रिल २०२२ । तालुक्यातील एका गावात शौचास गेलेल्या विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकाविरोधात जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला.

crime

अधिक माहिती अशी की, तालुक्यातील एका गावात १५ एप्रिल रोजी विवाहिता तिच्या देराणीसोबत शौचास जात असताना प्रवीण उर्फ रावसू काळे याने मागून पकडले. त्यानंतर तू मला आवडते, माझ्यासोबत शरीर संबंध ठेव, असे बोलून स्त्री मनास लज्जा निर्माण होईल असे कृत्य केले. एवढेच नव्हे तर, याबाबत कुणाला सांगितले तर तुला सोडणार नाही, असे बोलून पळून गेला. या प्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून प्रवीण काळे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल लीलाधर महाजन हे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now