जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑगस्ट २०२५ । मुंबईत सुरु असलेल्या मुसळधार पावसाचा रेल्वेसेवेवरही परिणाम झाला आहे. रेल्वे प्रशासनाकडून मुंबईवरून पुणे आणि पुण्यावरून मुंबईकडे येणाऱ्या अनेक ट्रेन्स रद्द केल्या आहेत. त्याचसोबत इतर राज्यात जाणाऱ्या ट्रेन्स देखील रद्द करण्यात आल्या आहेत. यासोबतच काही प्रवासी रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. जर तुम्ही देखील आज मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वेचं तिकीट काढलं असेल तर त्याआधी रद्द झालेल्या गाड्यांची यादी तपासून घ्या.

२० ऑगस्टला या ट्रेन्स रद्द –
ट्रेन क्रमांक ११०१२ धुळे – सीएसएमटी एक्स्प्रेस
ट्रेन क्रमांक २०७०५ जालना – सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेस
ट्रेन क्रमांक १२१२६ पुणे – सीएसएमटी प्रगती एक्स्प्रेस
ट्रेन क्रमांक १२१२४ पुणे – सीएसएमटी डेक्कन क्वीन एक्स्प्रेस
ट्रेन क्रमांक ११००७ सीएसएमटी – पुणे डेक्कन एक्स्प्रेस

ट्रेन क्रमांक १२१२७ सीएसएमटी – पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस
ट्रेन क्रमांक २२१०५ सीएसएमटी – पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस
ट्रेन क्रमांक १२०७२ जालना – सीएसएमटी एक्स्प्रेस
ट्रेन क्रमांक १२१४० नागपूर – सीएसएमटी एक्स्प्रेस
ट्रेन क्रमांक २२२२६ सोलापूर – सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेस
ट्रेन क्रमांक ११०१० पुणे – सीएसएमटी डेक्कन एक्स्प्रेस
ट्रेन क्रमांक १२१३४ मंगलोर जंक्शन – सीएसएमटी एक्स्प्रेस
तर गाडी क्रमांक १२१११ मुंबई ते अमरावती एक्स्प्रेस २० रोजी मुंबईऐवजी नाशिक रोड येथून आपल्या नियोजित वेळेत सुटेल.
२१ ऑगस्टला ही ट्रेन रद्द –
ट्रेन क्रमांक ११००२ बल्लारशाह – सीएसएमटी एक्स्प्रेस












