तु माझ्या दुकानाचे साहित्य चोरले म्हणत दुकानदाराला मारहाण

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मे २०२२ । यावल तालुक्यातील आडगाव जवळील श्रीक्षेत्र सातपुडा निवासनी आई मनुदेवीच्या मंदिराजवळ पुजा साहित्य विक्री करणार्‍या एका व्यावसायीकाने सहकारी व्यावसायीकास मारहाण केल्याची घटना शुक्रवारी सकाळी 10 वाजता घडली. या प्रकरणी येथील पोलिसांत अदखलपात्र गुन्हा दाखल झाला.

crime 77 jpg webp

यावल पोलिसात गुन्हा दाखल
यावल तालुक्यातील आडगाव येथुन जवळचं सातपुड्याच्या कुशीत आई मनुदेवी मंदिर आहे. या तीर्थक्षेत्रावरील पूजा साहित्य व्यावसायीक विश्वदिप सुरेश पाटील (रा.आडगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मंदिरा जवळील संजय धडकु पाटील (आडगाव) यांचे पुजा साहित्य विक्रीचे दुकान आहे. या दुकानात शुक्रवारी सकाळी 10 वाजता पाटील दारू पिऊन आले हव काही एक कारण नसतांना त्यांनी विश्वदिप पाटील यांना तु माझ्या दुकानातील पुजा साहित्य चोरी केली म्हणून वाद घातला व मारहाण केली. या प्रकरणी यावल पोलिसात विश्वदिप पाटील यांच्या फिर्यादीवरून अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now