⁠ 
सोमवार, एप्रिल 22, 2024

शिवसेनेच्या कामगार सेनेच्या विभागीय अध्यक्षपदी मनोहर खैरनार

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ फेब्रुवारी २०२३ । भारतीय कामगार सेना (महासंघ) कार्याध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने, कामगार हिताची जोपासना करण्यासाठी भारतीय कामगार सेना संलग्न (शिवसेना प्रणित) राष्ट्रीय माथाडी जनरल कामगार सेना (रजि.) या संघटित असंघटित कामगारांच्या हक्क आणि अधिकारांच्या न्याया साठी झटणाऱ्या नोंदीकृत कामगार संघटनेच्या ” उत्तर महाराष्ट्र/ विभागीय अध्यक्षपदी ” अँड. मनोहर गिरधर. खैरनार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सदर नोंदीकृत संस्थेचे मुख्य कार्यालय जय सुधांशू चेंबर्स, बी विंग, पहिला माळा, स्टेशन रोड, कल्याण (पश्चिम) तालुका – कल्याण. जिल्हा – ठाणे येथे असून संघटनेचे सरचिटणीस रवींद्र रा.धनवाडे.यांनी शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला अँड .मनोहर खैरनार यांना नियुक्ती चे पत्र देऊन ही नियुक्ती घोषित केली आहे.या नियुक्ती बाबत अँड.मनोहर खैरनार यांचे शिवसेना ठाकरे गट आणि सामाजिक कार्यात विशेष वावर असलेल्या नागरिकांकडून व खासकरुन कामगारां कडून अभिनंदन होत आहे.