⁠ 
सोमवार, नोव्हेंबर 25, 2024
Home | जळगाव जिल्हा | रावेर | मांडूळ सर्पाची तस्करी करणाऱ्यास अटक

मांडूळ सर्पाची तस्करी करणाऱ्यास अटक

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ सप्टेंबर २०२२ । रावेर तालुक्यातील रोझोदा येथील देवेंद्र गिरधर लिधुरे हा मांडूळ सर्पाची तस्करी करत असल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्राप्त झाली. त्यानुसार धाड टाकली असता मांडूळ सर्प मिळून आला. दरम्यान, आरोपीस अटक होऊन रावेर वन विभागात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

रोझोदा येथील देवेंद्र गिरधर लिधुरे कडे गांडूळ सर्प लवपुन ठेवला असल्याची माहिती वन विभागाला प्राप्त झाली होती. त्यानुसार वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करून मांडूळ सर्प हस्तगत केला आहे.सदरील कारवाई यावल उपवनसंरक्षक प्रथमेश हाडपे,यावल वनक्षेत्रपाल विक्रम पद्मोर,फिरते पथकाचे वनक्षेत्रपाल आनंदा पाटील,रावेर वनक्षेत्रपाल अजय बावणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

आरोपी विरुद्ध भारतीय वन अधिनियम १९२७ व वन्यजीव संरक्षण अधिनियम१९७२ अन्वये गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली आहे. कार्यवाहीसाठी पोलीस पाटील रोझोदा, वनपाल रावेर रवींद्र सोनवणे,वनपाल फैजपूर अतुल तायडे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन तडवी,वनरक्षक- संभाजी सूर्यवंशी,गोवर्धन डोंगरे, तुकाराम लवटे, सुपडू सपकाळे,कृष्णा शेळके, युवराज मराठे, राजू बोंडल, अरुणा ढेपले,आयशा पिंजारी, सविता वाघ, वाहन चालक आनंद तेली, इमाम तडवी सचिन पाटील, विनोद पाटील यांचे सहकार्य लाभले.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह