शालेय वाहनांच्या कागदपत्रांची तपासणी अनिवार्य ; ३१ मे पुर्वी कागदपत्रांची पुर्तता करण्याचे आवाहन

मे 13, 2026 6:09 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांनी जून २०२६ पासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक सत्रापूर्वी स्कूलबस व व्हॅनची कागदपत्रे तपासणे अनिवार्य करण्यात आले आहे. वाहनाची योग्यता प्रमाणपत्र, परवाना, पीयूसी, विमा आदी कागदपत्रे वैध असल्याची खात्री करूनच विद्यार्थ्यांच्या वाहतुकीस परवानगी द्यावी. शाळा व्यवस्थापन स्तरावर प्रत्यक्ष तपासणी करुन कागदपत्रे अपूर्ण असल्यास हे कागदपत्रे वैध करुन घेण्याबाबत संबंधित वाहनचालक , मालक यांना शाळा व्यवस्थापन स्तरावरुन सुचना देण्यात याव्यात.

school bus

वाहनांची सर्व कागदपत्रे वैध असल्यावरच त्यांना शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करण्याची मुभा द्यावी. शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक सुरक्षितपणे व विना अपघात व्हावी यासाठी सर्व शैक्षणिक संस्थांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत देण्यात आले आहेत.

तपासणीदरम्यान कागदपत्रे अपूर्ण आढळल्यास संबंधित वाहन जप्त करण्यात येणार असून, त्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापन व वाहनधारकांवर राहील व त्यामुळे विद्याथ्यांच्या होणा-या गैरसोयीस संबंधित शाळा व्यवस्थापन / वाहतुकदार यांची सर्वस्वी जबाबदारी राहील असेही प्रादेशिक परिवहन कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

तसेच जिल्ह्यातील सर्व परवानाधारक स्कूलबस , व्हॅन वाहनधारक , चालक यांनी नियमानुसार त्यांच्या वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण तसेच वाहनकर व इतर अनुषंगिक कागदपत्रांची ३१ मे २०२६ पूर्वी पूर्तता करुन घ्यावी. योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणासाठी विशेष बाब म्हणून या कार्यालयातर्फे अतिरिक्त अपॉईंटमेंट (विशेष कोटा) ची सुविधा उपलब्ध करुन येणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वर्मा यांनी दिली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now