जळगाव लाईव्ह न्यूज । ८ डिसेंबर २०२१ । चाळीसगाव-धुळे पॅसेंजर लवकरात लवकर सुरू करण्यात यावी तसेच प्रवाशांना जनरल तिकीट सुरू करावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. मागणी मान्य न झाल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यात देण्यात आला आहे.
कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे रेल्वे विभागाकडून गेल्या दीड ते दोन वर्षांपासून पॅसेंजर गाडी बंद करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांचे हाल होत असून अतिरिक्त भाडे देऊन खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. बुधवार दि.८ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने चाळीसगाव-धुळे पॅसेंजर लवकरात लवकर सुरू करण्यात यावी. तसेच प्रवाशांना जनरल तिकीट सुरू करावे, या मागणीचे निवेदन चाळीसगाव रेल्वे प्रशासनाला देण्यात आले. या मागण्या लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी चाळीसगाव मनसेचे तालुकाध्यक्ष संग्रामसिंग शिंदे, शहराध्यक्ष आण्णा विसपुते, उपशहर प्रमुख पंकज स्वार, दर्शन चौधरी, दिपक चौधरी यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.