संतापजनक : भुसावळात अल्पवयीन मुलीवर मामा, काकाचा अत्याचार

जून 25, 2021 11:17 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जून २०२१ । भुसावळात नात्याला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशातून भुसावळ येथील मावशीकडे आलेल्या अल्पवयीन बालिकेचा मावसानेच विनयभंग केल्यानंतर पीडीता मामांकडे आली मात्र तेथे मामानेच बालिकेवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली. 

crime

याप्रकरणी गुरुवारी पीडित मुलीची मावशी, मावसा व मामा विरूद्ध बाजारपेठ पोलिस ठाण्यात बलात्कार आणि पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला. २१ जून २०२१ च्या सात महिन्यांपूर्वी हे अत्याचार झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

बऱ्हाणपूर येथून १७ वर्षीय मुलगी सात महिन्यांपूर्वी भुसावळ शहरातील नेमाडे कॉलनीतील रहिवासी तिची मावशीकडे शिक्षणासाठी आली होती. या दरम्यान तिचा मावसा याने तिचा विनयभंग केला. मावसाचे हे कारनामे मुलीने तिच्या मावशीला सांगितले. मात्र, मावशीने दुर्लक्ष केले. यानंतर मुलीला तिचा भाऊ (पीडित मुलीचा मामा) कडे राहण्यासाठी पाठवले. 

मात्र, तेथेही मामाने सलग सात महिने अत्याचार केले. मात्र, पीडित मुलीने गुरुवारी बाजारपेठ पोलिसांत फिर्याद दिली. यानुसार मावसा, मामा आणि मावशी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यापैकी दोन जणांना अटक झाली. त्यांना आज शुक्रवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. तपास निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक गणेश धुमाळ, सुभाष साबळे करीत आहेत. 

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now