जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मार्च २०२२ । जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाला बळी पडलेल्या हिंदूंचे चित्रण करणारा “द काश्मीर फाइल्स” चित्रपट राज्यात टॅक्स फ्री करावा. जेणेकरून जम्मू काश्मीरमधील हिंदू समाजावर दहशतवाद्यांनी अनन्वित अत्याचार केले. याचे योग्य आणि खरे चित्रिकरण प्रथमच एखाद्या चित्रपटाच्या माध्यमातून या देशातील जनतेला पाहता येईल. अशा आशयाचे निवेदन भाजपा’तर्फे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

या प्रसंगी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, युवा मोर्चा महानगर जिल्हाध्यक्ष आनंद सपकाळे यांच्या मार्गदर्शन खाली युवा मोर्चा सरिचटणीस जितेंद्र चौथे, मिलिंद चौधरी, अक्षय जेजुरकर, महेश पाटील, उपाध्यक्ष गणेश महाजन, राहुल लोखंडे, राहुल मिस्तरी, रियाज शेख, सचिन बाविस्कर, स्वामी पोतदार, चिटणीस अश्विन सैंदाणे, प्रतीक शेठ, सागर जाधव, जयंत चव्हाण, रोहित सोनवणे, प्रसिद्धी प्रमुख गौरव पाटील, कार्यालय प्रमुख भूषण पाटील, सोशल मिडिया प्रमुख भूषण जाधव, सोशल मिडिया सहप्रमुख पुष्पेंद्र जोशी तसेच युवा मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.








