⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

Cannabis Smuggling : जळगाव एलसीबीची मोठी कारवाई, १ कोटीचा गांजा पकडला!

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जुलै २०२२ । जळगाव जिल्हा अंमली पदार्थ तस्करीचे मोठे हब बनत चालले असल्याचे दिवसेंदिवस समोर येत असल्या कारवाईतून दिसून येत आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास जळगाव एलसीबीच्या पथकाने नशिराबाद जवळील तिघ्रे शिवारातून तब्बल एक कोटी रुपयांचा ८८५ किलो गांजा जप्त केला आहे. गेल्या काही महिन्यातील जळगाव जिल्ह्यातील ही मोठी कारवाई असून पथकाने एकाला ताब्यात घेतले आहे.

भुसावळ तालुक्यातील तिघ्रे गावातील मनोज रोहिदास जाधव हा एका खोलीत मोठ्याप्रमाणात गांजाचा साठा करून त्याची विक्री करीत असल्याची माहिती एलसीबीचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली होती. बकाले यांनी तात्काळ याबाबत पोलीस अधीक्षक डॉ.प्रविण मुंडे, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उप विभागीय पोलीस अधीकारी भुसावळ भाग सोमनाथ वाघ-चौरे यांच्यासोबत छापा टाकण्यापुर्वी चर्चा करुन मार्गदर्शन घेतले. गुन्ह्याच्या अनुषंगाने बकाले यांनी नशिराबाद पो.स्टेला येऊन छापा टाकण्यासाठी मुख्य अधिकारी नगर परिषद, नशिराबाद यांच्याकडून शासकीय पंच मिळवून निरीक्षक किरणकुमार बकाले व स्थानिक गुन्हे शाखा पोलीस पथक तसेच नशिराबाद पो.स्टे.चे प्रभारी अधिकारी सपोनि अनिल मोरे व पोलीस अंमलदार यांच्यासह बातमी प्रमाणे तिघ्रे गावात छापा टाकला.

गावातील मनोज रोहीदास जाधव याच्या राहते घराचे मागच्या खोलीत मानवी जीवनास अपायकारक ठरणारा अंमली पदार्थ गांजा तब्बल ८८५ किलो अंदाजे १ कोटी ६ लाख २० हजार किमतीचा मिळुन आल्याने ते जागीच जप्त करुन ताब्यात घेण्यात आले. पथकाने त्याठिकाणाहून नामे राहुल काशिनाथ सुर्यवंशी वय-२५ रा. वाडीशेवाडा ता.पाचोरा यास ताब्यात घेतले आहे.

कारवाई एलसीबीचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्यासह पथकातील, सपोनि जालींदर पळे, पोउनि अमोल देवढे, सहाय्यक फौजदार युनुस शेख ईब्राहीम, वसंत लिंगायत, रवी नरवाडे, हवालदार सुनिल दामोदरे, कमलाकर बागुल, अनिल देशमुख, दिपक पाटील, अक्रम शेख, संदीप साबळे, नंदलाल पाटील, विजय शामराव पाटील, भगवान पाटील, नितीन बाविस्कर, प्रमोद अरुण लाडवंजारी, ईश्वर पाटील, लोकेश माळी, रमेश जाधव, विजय चौधरी, दर्शन ढाकणे, सर्व नेम, स्थानिक गुन्हे शाखा, नशिराबाद स्टेचे प्रभारी अधीकारी सपोनि अनिल मोरे, पोउनि राजेंद्र साळुंखे, गजानन देशमुख, किरण बाविस्कर, रविद्रं इंघाटे, सुधिर विसपुते, समाधान पाटील, विजय अहीरे, दिनेश भोई अशांनी संयुक्त रित्या केली आहे.