जळगाव जिल्हा
जळगावात महायुतीचा मेळावा उत्साहात
जळगाव लाईव्ह न्यूज । राज्यभरात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर जळगावात २७ ऑक्टोबर रोजी मंडळ क्रमांक ७,८ व ९ येथील भारतीय जनता पार्टी, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट), आर.पी.आय आठवले गट, कवाडे गट, राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टी या सर्वांचा संयुक्त महायुतीचा मेळावा आमदार राजुमामा भोळे यांच्या उपस्थितीत पार पडला. अतिशय उत्साहात हा मेळावा पार पडला.
या महायुती मेळाव्याप्रसंगी भाजपा महानगर अध्यक्षा उज्वलाई बेंडाळे,भगतजी बालाणी, राष्ट्रवादीचे विनोदजी देशमुख, आरपीआयचे अनिलजी अडकमोल, सदाशिव ढेकळे, दिपकजी सूर्यवंशी, मिलिंदजी सोनवणे, राहुल नेतलेकर, राजेंद्रजी घुगे पाटील, जितजी मराठे, महेशजी पाटील, गणेशजी सोनवणे, नितीन इंगळे, महेशजी जोशी, विशाल त्रिपाठी, गोपालजी पोपटाणी, महादूजी सोनवणे आदी उपस्थित होते.