अशी संधी मिळणार नाही! महावितरण अंतर्गत जळगाव येथे 140 पदांसाठी, उद्या शेवटची संधी

ITI पास असलेल्या उमेदवारांसाठी एक उत्तम संधी चालून आलीय. ती म्हणजे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, जळगाव येथे भरती होणार आहे. तब्बल 140 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती होणार असून त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 फेब्रुवारी 2023 आहे.

या पदासाठी होणार भरती?
शिकाऊ उमेदवार (इलेक्टीशियन- 88 पदे), शिकाऊ उमेदवार (वायरमन – 35 पदे), शिकाऊ उमेदवार (संगणक चालक- 17 पदे) या पदांसाठी ही भरती होणार..

काय आहे आवश्यक पात्रता?
शिकाऊ उमेदवार (इलेक्टीशियन) – शैक्षणिक पात्रता १० वी व मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा दोन वर्षांचा आय. टी. आय. इलेक्ट्रीशियन किंवा वायरमन / संगणक चालक (कोपा) परीक्षा मागील ३ शैक्षणिक ( २०१९-२० २०२० २१ २०२१-२२) वर्षात उत्तीर्ण. खुल्या प्रवर्गासाठी किमान ६५% व मागासवर्गीयांसाठी ६०% गुण आवश्यक

शिकाऊ उमेदवार (वायरमन) – शैक्षणिक पात्रता १० वी व मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा दोन वर्षांचा आय. टी. आय. इलेक्ट्रीशियन किंवा वायरमन / संगणक चालक (कोपा) परीक्षा मागील ३ शैक्षणिक ( २०१९-२० २०२० २१ २०२१-२२) वर्षात उत्तीर्ण. खुल्या प्रवर्गासाठी किमान ६५% व मागासवर्गीयांसाठी ६०% गुण आवश्यक

शिकाऊ उमेदवार (संगणक चालक) –शैक्षणिक पात्रता १० वी व मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा दोन वर्षांचा आय. टी. आय. इलेक्ट्रीशियन किंवा वायरमन / संगणक चालक (कोपा) परीक्षा मागील ३ शैक्षणिक ( २०१९-२० २०२० २१ २०२१-२२) वर्षात उत्तीर्ण. खुल्या प्रवर्गासाठी किमान ६५% व मागासवर्गीयांसाठी ६०% गुण आवश्यक

अर्ज कसा कराल?
पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. Short Training Center, Maharashtra State Electricity Distribution Company Limited, Board Office, Vidyut Bhavan, M. Income. Dc Jalgaon-425003 या पत्त्यावर आपला अर्ज पाठवावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 फेब्रुवारी 2023

अधिकृत संकेतस्थळ :
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा