---Advertisement---
नोकरी संधी

10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी महापारेषण कंपनीत संधी..त्वरित करा अर्ज

---Advertisement---

Mahatransco Recruitment 2022: महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड म्हणजेच महापारेषण (MAHATRANSCO) भरती निघाली आहे. यासाठी दहावी उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी कंपनीत नोकरीचा अनुभव घेण्याची सुवर्णसंधी आहे. अप्रेन्टिस पदासाठी ही भरती होणार असून या भरतीसाठी उमेदवार ३१ जानेवारीपर्यंत अर्ज करू शकणार आहेत. अप्रेन्टिस इलेक्ट्रिशिअन ट्रेडच्या एकूण ४० जागा रिक्त आहेत.

mahatransco bharti 2022 jpg webp

महाट्रान्स्कोमधील या भरतीसाठी इच्छुक आणि योग्य उमेदवार ३१ जानेवारी २०२२ पर्यंत अर्ज करू शकतील. त्यासाठी कंपनीने जारी केलेल्या अधिसूचनेतील सविस्तर माहिती घेऊन अर्ज करता येईल.

---Advertisement---

शैक्षणिक पात्रता

इलेक्टिशियन अप्रेन्टिस पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून दहावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. याशिवाय संबंधित पदाच्या गरजेनुसार संबंधित ट्रेडमधील आयटीआय प्रमाणपत्रही असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

इलेक्टिशियन अप्रेन्टिस पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय ३८ वर्षे असावे. उमेदवारांचे वय ३१ जानेवारी २०२२ या तारखेपर्यंत मोजले जाईल.

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

हे देखील वाचा :

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---