भारतीय सैन्यात अधिकारी होण्यासाठी पदवीधर विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी

मे 9, 2025 4:02 PM

जळगाव | भारतीय सैन्यात अधिकारी होण्याची इच्छा असलेल्या तांत्रिक शाखेतील पदवीधर विद्यार्थ्यांसाठी ही एक महत्वाची संधी आहे. भारतीय सैन्याने टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स (TGC-142) साठी अधिसूचना प्रकाशित केली आहे. ही अधिसूचना अधिकृत संकेतस्थळ www.joinindianarmy.nic.in वर उपलब्ध आहे.

army

या योजनेअंतर्गत तांत्रिक पदवीधरांना भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून सामील होण्याची संधी आहे. विद्यार्थी www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख 29 मे 2025 आहे. या कोर्ससाठी फक्त तांत्रिक शाखेतील पदवीधर उमेदवारच अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment