जळगाव लाईव्ह न्यूज । तुषार देशमुख । अध्यात्मिक उन्नती आणि राष्ट्रकल्याण या वाक्याला अनुसरून देव, देश,अन धर्मासाठी तब्बल 1कोटी 25 लाख 34 हजार 576 तास महाश्रमदान करण्याचा संकल्प जगद्गुरु जनार्दन स्वामींचे उत्तराधिकारी श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी आपल्या जय बाबाजी भक्त परिवाराच्या माध्यमातून केला आहे.
या श्रमदान सोहळ्याचा एक भाग म्हणून आज दिनांक 13 रोजी चाळीसगावातील तहसील परिसर आणि शहर पोलीस स्टेशन परिसरामध्ये जय बाबाजी भक्त परिवाराच्या माध्यमातून स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यामध्ये मोठ्या संख्येने जय बाबाजी परिवारातील लोक उपस्थित होते. यावेळी तहसील परिसर आवारातील संपूर्ण स्वच्छता करण्यात आली. या स्वच्छतेसाठी चाळीसगावच्या तहसील प्रशासनाकडे रितसर अर्ज करण्यात आला होता. आणि तशी परवानगी सुद्धा तहसील प्रशासनाने भक्त परिवाराला दिली होती.
या महाश्रमदान सोहळ्याचा महासंकल्प महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी नर्मदा नदीच्या तीरावर गुजरात येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सर्वात मोठ्या पुतळ्याच्या साक्षीने केलेला आहे. या महाश्रमदान सोहळा अंतर्गत गावातील शहरातील हिंदूंची मंदिरे, सरकारी कार्यालय, शासकीय जागा, सार्वजनिक ठिकाणे इत्यादी स्वच्छ करणे. आणि विशेषत मंदिरे स्वच्छ करणे, मंदिरे धुऊन काढणे, मंदिरांवर ती नवीन भगवा ध्वज लावणे, गावागावातील मंदिरांमध्ये नित्यनियम विधी आरतीचा नियम सुरू ठेवणे. तरुण पिढीला धार्मिक सुसंस्कारित आणि निर्व्यसनी बनवणे हा यामागील मुख्य उद्देश आहे. आणि आत्तापर्यंत आपल्या अध्यात्मिक शक्तीच्या जोरावर लाखो लोकांना व्यसनमुक्त करण्याचे काम जगद्गुरु जनार्दन स्वामी व त्यांचे उत्तराधिकारी महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी केलेले आहे.