⁠ 
शनिवार, ऑक्टोबर 5, 2024
Home | जळगाव जिल्हा | पावसाचे दमदार आगमन होणार ; महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता, जळगावात..

पावसाचे दमदार आगमन होणार ; महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता, जळगावात..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ सप्टेंबर २०२४ । मागील काही दिवसापासून जळगावसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने विश्रांती घेतलीय. अशातच हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविला आहे. गणरायाने निरोप घेतल्यानंतर आता राज्यामध्ये पावसाचे दमदार आगमन होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. जळगाव जिल्ह्यातही आज सकाळपासून पावसाच्या तुरळक सरी कोसळत आहे.

यंदा मान्सून पाऊस आतापर्यंत चांगला बरसला आहे. मागील काही दिवसापासून पावसाने विश्रांती घेतल्याने तापमानात वाढ झाली होती. यातच शेतकरीही खरिपातील काही पिके काढण्यात व्यस्त आहेत. मात्र यातच आता हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविला आहे. सप्टेंबरच्या शेवटपर्यंत राज्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये 2 ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज होण्याची शक्यता आहे. 21 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या काळात महाराष्ट्रात पाऊस कोसळणार आहे.

विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांशी भागात पावसाची शक्यता आहे. नांदेड, लातूर, परभणी, सांगली, सातारा, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, कोकण, अहमदनगर , पुणे, बीड या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होणार आहे. या जिल्ह्यांमध्ये पाऊस बरसण्याची शक्यता आहे.

देशातील बहुतांश भागात पावसाची संततधार सुरू आहे. हा पाऊस आणखी काही दिवस कायम राहणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले. हवामान तज्ज्ञांच्या मते, दोन-चार दिवस दिल्लीतसह अनेक राज्यांमध्ये पाऊस बरसत राहील. IMD ने आज दिल्ली, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या काही भागात ढगाळ पावसाचा अंदाज जारी केला आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.