⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

महाराष्ट्र, भारताचा एकच बाप ‘छत्रपती शिवाजी महाराज’ : देवेंद्र फडणवीसांचा घणाघाती प्रहार

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मे २०२२ । शिवसेनेवाले सांगताय आम्ही मुंबईचे बाप. तुम्ही म्हणजे मुंबईचे मालक नाही, तुम्ही म्हणजे हिंदुत्व नाही. आम्ही म्हणे मुंबईचे बाप. अरे अनारौस मुलगा ऐकले होते अनारौस बाप कुठून आला. मुंबई आणि भारताचा एकच बाप आहे छत्रपती शिवाजी महाराज, असा घणाघाती टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

मुंबईत आयोजित हिंदी भाषी महासंकल्प सभेच्या निमित्ताने ते बोलत होते. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या जोरदार तयारी सुरू असून शिवसेना आणि भाजपात चांगलीच टक्कर आहे. कालच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भव्य सभा घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपला टार्गेट केले होते. आज आयोजित सभेत देवेंद्र फडणवीस यांनी त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले.

कालची सभा म्हणजे लाफ्टर सभा होती अशी सुरुवात करीत फडणवीस यांनी ओवैसीवर टीका केली. राज्यात हनुमान चालीसा म्हटल्यावर राजद्रोह लागतो आणि औरंगजेबच्या कबरीवर माथा टेकल्यावर राज शिष्टाचार होतो. औरंगजेब एकच सांगायचा संभाजी धर्म बदल दो पण संभाजी राजांनी सांगितले होते की, ना स्वराज्य देंगे ना धर्म बदलेंगे. अरे ओवेसी सून ले, कुत्ता भी ना पेशाब करेंगा औरंगजेब की पहचान पर, अब जो भगवा लेहरायगा पुरे हिंदुस्थान पर. जो छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेणाऱ्यांनी तलवारी म्यान केल्या. आमच्या तलवारी तर आम्ही बाहेरच ठेऊन फिरतो, असे फडणवीस म्हणाले.

ना.देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बद्दलची भाषा काल उद्धव ठाकरे यांनी वापरली ती भाषा सोनिया गांधी यांना दाखविण्यासाठी आहे. त्यांना सोनियांना दाखवायचे होते की, आम्ही हिंदुत्व सोडले नाहीये पण संघाला आम्ही विरोध करत आहोत. जेव्हा आणीबाणी लागली तेव्हा तुम्ही इंदिरा गांधींच्या बाजूने होते. हा इतिहास फडणवीस विसरले. जनसंघ तेव्हापासून आहे जेव्हा तुमचा पक्ष पैदा देखील झाला नव्हता. तेव्हा जनसंघाच्या तिकिटावर उत्तमराव नाना निवडून आले होते, असे फडणवीस म्हणाले.

मुंबई आम्ही तोडू असा तुम्ही म्हणता पण कोणाच्या बापाची हिम्मत आहे मुंबईला तोडण्याची. मुंबईला कोणीच हाथ लावू शकत नाही. आम्हाला मुंबई वेगळी करायची आहे. पण ती तुमच्या भ्रष्टाचारापासून, तुमच्या अन्यायापासून वेगळी करायची आहे, असे फडणवीस म्हणाले. तसेच दुसरीकडे फडणवीस म म्हणाले की , सरकार, दारू, बार टॅक्स कमी केला मात्र, सर्वसामान्य जनतेची या सरकारला पडलेली नाही. पेट्रोलचे दर वाढले आहेत. दुसरीकडे ओबीसी आरक्षण निघून गेले, असे फडणवीस म्हणाले.