महाराष्ट्रराजकारण

आजच्या बैठकीत शिंदे सरकारने घेतले ‘हे’ नऊ मोठे निर्णय, घ्या जाणून

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्युज । १४ जुलै २०२२ । आज एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची बैठक झाली. या बैठकीत शिंदे-भाजप सरकारकडून जनहिताचे मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिंदे-फडणवीस सरकारने आश्वासन दिल्याप्रमाणे इंधनावरील करात कपात केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पेट्रोल ५ रुपये तर डिझेल तीन रुपयांनी स्वस्त झाले आहे. नगराध्यक्ष, सरपंच थेट लोकांमधूनच निवडले जाणार असल्याचा निर्णय देखील घेतला आहे. आजच्या या बैठकीत नऊ मोठे निर्णय घेण्यात आले असून ते कोणकोणते आहेत ते जाणून घेऊयात..

बैठकीतील निर्णय

पेट्रोलवर 5 रुपये आणि डिझेलवर 3 रुपये प्रति लिटर दर कमी करण्याचा निर्णय (वित्त विभाग)

राज्यात “स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) 2.0 अभियान” राबवण्यात येणार (नगर विकास विभाग)

केंद्र पुरस्कृत अमृत अभियान 2.0 (Atal Mission For Rejuvenation & Urban Transformation) राज्यात राबवणार (नगर विकास विभाग)

नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांची निवडणूक थेट पद्धतीने घेणार (नगर विकास विभाग)

राज्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचाची ग्रामपंचायतीमधून थेट निवडणूक घेणार. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्या संबंधित कलमांमध्ये सुधारणा (ग्रामविकास विभाग)

अध्यक्ष, उपाध्यक्ष कालावधी तीन महिन्यांपर्यंत वाढवणार

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, 1969 मधील कलम 43 मध्ये सुधारणा. (ग्रामविकास विभाग)

बाजार समितीतील सर्व शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार. महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम 1963 मध्ये सुधारणा (पणन विभाग)

आणीबाणीच्या कालावधीत ज्या व्यक्तींना बंदिवास सोसावा लागला, अशा व्यक्तींचा सन्मान/यथोचित गौरव करण्याची (दिनांक 31 जुलै, 2020 रोजी बंद करण्यात आलेली ) योजना पुन्हा सुरु करणार (सामान्य प्रशासन विभाग)

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button