⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

जळगाव जिल्ह्यात लंपीने घेतला तब्बल अडीच हजार गुरांचा बळी

जळगाव लाईव्ह न्यूज । चिन्मय जगताप । संपूर्ण महाराष्ट्रासह जिल्ह्यात लम्पी व्हायरसचा कहर आपल्याला पाहायला मिळाला. यातच एक थक्क करणारी आकडेवारी समोर आली आहे. ती म्हणजे व्हायरसमुळे जिल्ह्यात तब्बल अडीच हजार गुरांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात अनेक जिल्ह्यात लम्पी रोगाचा कहर पाहायला मिळाला होता. तर जळगाव जिल्ह्यात तब्बल १५ तालुक्यांमध्ये हा कहर पाहायला मिळाला. जामनेर तालुक्यात सर्वाधिक कहर पाहायला मिळाला. संपूर्ण जिल्हात तब्बल २७ हजार ७३४ गुरांना लंपी रोग झाला. ज्यातील २३ हजार ३५८ गुरं हि बरी झाली आहेत. तर २४५२ गुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

लसीकरण एकच पर्याय
लम्पी आजाराचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यांकडून उपाययोजना तसंच लसीकरण करण्यात आल्या लम्पीचा संसर्ग एका राज्यातून दुसऱ्या राज्यात पसरत असल्याचं चित्र दिसत असतांना. लम्पी आजारावर मात करण्यासाठी पशुसंवर्धन विभागानं आवश्यक पावलं तातडीनं उचलावीत, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. पर्यायी जिल्ह्यात तब्बल ५ लाख ६५ हजार गुरांना लस देण्यात आली.

लम्पी आजाराची लक्षणं
जनावरांच्या डोळ्यांतून, नाकातून पाणी येणं
लसिकाग्रंथींना सूज येणं, ताप येणं
दुधाचं प्रमाण कमी होणं
तोंडात व्रण आल्याने चारा खाणे, पाणी पिणे कमी होणं
त्वचेवर मोठ्या गाठी येणं
पायावर सूज आल्यानं जनावरं लंगडतात

जनावरांची काळजी कशी घ्याल?
निरोगी जनावरांना बाधित जनावरांपासून वेगळं बांधा
गायी आणि म्हशींना एकत्रित ठेवू नका
बाधित गावांमध्ये चारा-पाण्याची स्वतंत्र सोय करा
निर्जंतुक द्रावणाची परिसरात फवारणी करा