---Advertisement---
जळगाव जिल्हा

महाकुंभमेळ्यासाठी भुसावळ मार्गे धावणार सहा विशेष रेल्वे गाड्या..

train
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ फेब्रुवारी २०२५ । प्रयागराज येथे सुरु असलेल्या महाकुंभमेळाव्यासाठी वेगवेगळ्या राज्यातून नव्हे तर देशविदेशातून भाविक येत असून याच दरम्यान प्रवाशांची मोठी गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाकडून विविध विशेष गाड्या चालविण्या जात आहे. यातच महाकुंभमेळाव्याला जाण्यासाठी विशेष हुबळी ते वाराणसी अशा सहा रेल्वे फेऱ्या होणार आहेत.

train

प्रयागराज येथील महाकुंभमेळा २०२५ साठी हुबळी ते वाराणसी दरम्यान सहा फेऱ्या होणार आहेत.ही ट्रेन पुण्यासह सातारा, दौंड, मिरज, सांगली,अहिल्यानगर, भुसावळ येथून धावणार आहे. त्यामुळे येथील प्रवाशांना प्रयागराजला जाण्यासाठी विशेष गाडी उपलब्ध झाली आहे.

---Advertisement---

प्रयागराज येथे होणाऱ्या कुंभमेळ्याला प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन हुबळी-वाराणसी विशेष ट्रेन धावणार आहे.त्यामध्ये ट्रेन क्रमांक ०७३८३ ही विशेष रेल्वे गाडी १४, २१ आणि २८ रोजी हुबळी येथून सकाळी आठ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी साडेपाच वाजता वाराणसी येथे पोहचेल.

ट्रेन क्रमांक ०७३८४ ही विशेष गाडी १७ आणि २४ फेब्रुवारी आणि ३ मार्च रोजी वाराणसी येथून सकाळी पाच वाजता सुटेल व हुबळी येथे तिसऱ्या दिवशी रात्री १२ वाजून ४५ मिनिटांनी पोहचेल.

या गाडीला एक वातानुकूलित द्वितीय, चार वातानुकूलित तृतीय, ११ शयनयान, १ सामान्य द्वितीय सिटिंग असलेली गार्ड्स ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार असेल. ही ट्रेन मिरज, सांगली, किर्लोस्करवाडी, कराड, सातारा, पुणे, दौंड कॉर्ड लाईन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड आणि भुसावळ मार्गे धावणार आहे.

तसेच बिदर ते दानापूर विशेष दोन फेऱ्या, चर्लपल्ली ते दानापूर विशेष चार फेऱ्या आणि मछलीपट्टनम ते दानापूर विशेष चार फेऱ्या असणार आहेत. दरम्यान, मध्य रेल्वे महाकुंभ मेळासाठी ४२ विशेष गाड्या चालवत आहे, त्यापैकी १८ फेऱ्या मुंबई ते बनारस/मऊ दरम्यान, १२ नागपूर ते दानापूर दरम्यान आणि १२ पुणे ते मऊ दरम्यान गाड्या आहेत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---