⁠ 
शनिवार, ऑक्टोबर 5, 2024
Home | जळगाव जिल्हा | भव्य वारूळ, उंचीवर वसलेले महादेव स्थान ‘शिवधाम मंदिर’

भव्य वारूळ, उंचीवर वसलेले महादेव स्थान ‘शिवधाम मंदिर’

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ ऑगस्ट २०२२ । पवित्र श्रावण महिना सुरु असून जळगाव लाईव्हच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या महादेव मंदिरांची माहिती आपल्यापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. गेल्या आठवड्यात शहरातील बडे जटाधारी महादेव मंदिराला भेट दिल्यानंतर आज आपण पाहणार आहोत जळगावातून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर निमखेडी रोड या ठिकाणी वसलेले शिवधाम मंदीर आहे. चला तर जाणून घेऊया मंदिराची माहिती..

जळगाव शहरापासून साधारणतः ५ किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य वातावरणात वसलेले एक सुंदरसे मंदिर म्हणजे श्री शिवधाम मंदिर. निमखेडी शिवारात स्थित मंदिरात श्रावणात सोमवारी आध्यात्मिक व सामाजिक कार्यक्रम होत असतात. हरी शंकर पुरनचंद अग्रवाल चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून साकारण्यात आलेल्या मनमोहक वास्तुकलेने अनेकांना मोहित केले. पहिल्या माळ्याच्या उंचीवर उभारण्यात आलेले शिवधाम मंदिर जनमाध्यमातून भाविक भक्तांसाठी आपल्या अनोख्या कार्यक्रमामुळे जिल्ह्यात नावारूपास आले आहे.

मंदिराच्या परिसरात प्रवेश करताच सर्वात आधी मोठ्या वारुळाचे दर्शन होते. भाविक असे म्हणतात की वारुळात एक नाग असून दरवर्षी मंदिराची उंची काही इंचाने वाढत असते. मंदिरात प्रवेश केल्यावर गाभाऱ्यात महादेवाची मनमोहक मूर्ती व शिवलिंग आहे. मंदिराच्या मागील बाजूला राधाकृष्ण, राम लक्ष्मण सीता व हनुमान यांची देखील आकर्षक मूर्ती विराजमान आहे. मंदिर परिसर मोठा असल्याने येथे वेगवेगळ्या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.

पहा व्हिडिओ :

author avatar
टीम जळगाव लाईव्ह