⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

MAHA METRO मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, मिळणार भरघोस पगार.. जाणून घ्या पात्रता?

जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑगस्ट २०२२ । महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड नागपूरमध्ये भरती निघाली असून यासाठीची यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ ऑगस्ट अशी असणार आहे. नोकरीत अवघ्या १० जागा असून तब्बल २ लाख ६० हजारांपर्यंत पगाराची संधी मिळणार असल्याने अभियंत्यांनी लवकरात लवकर अर्ज करावा.

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

अतिरिक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (Additional Chief Project Manager) – B.E./ B. Tech. in Electrical Engineering पर्यंत मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

वरिष्ठ उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक (Senior Deputy Chief Project Manager) – उमेदवारांनी संबंधित पदांनुसार B.E./ B. Tech. in Electrical Engineering पर्यंत मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक आयटी (Senior Deputy General Manager IT) – पदांनुसार उमेदवाराने B.E./ B. Tech. in Computer/ IT Engineering पर्यंत मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

उपमहाव्यवस्थापक (Deputy General Manager) – पदांनुसार उमेदवाराने B.E. / B. Tech पर्यंत मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

व्यवस्थापक (Manager) – संबंधित पदांनुसार उमेदवाराने B.E. / B. Tech पर्यंत मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

भरगोस वेतन :
अतिरिक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक – 1,00,000 – 2,60,000 रुपये प्रतिमहिना
वरिष्ठ उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक- 80,000 – 2,20,000 रुपये प्रतिमहिना
वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक आयटी – 80,000 – 2,20,000 रुपये प्रतिमहिना
उपमहाव्यवस्थापक – 70,000 – 2,00,000 रुपये प्रतिमहिना
व्यवस्थापक : 60,000 – 1,80,000 रुपये प्रतिमहिना

अर्ज कुठे करावा : मेट्रो भवन, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, व्हीआयपी रोड, दीक्षाभूमी जवळ, रामदासपेठ, नागपूर- 440010

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 ऑगस्ट 2022

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा