मच्छू नदीवरील पूल कोसळला : १३२ हून जास्त लोकांचा मृत्यू

गुजरातच्या मोरबीमधील रविवारी सायंकाळी दुर्घटना घडली. यावेळी मच्छू नदीवरील पूल कोसळला. घटनेत आतापर्यंत १३२ हून जास्त लोकांचा मृत्यू झाला झाल्याचे म्हट्ले जात आहे. रविवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास ही भीषण घटना घडली. १०० वर्षं जुना झुलता पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेतून १७७ जणांचा जीव वाचवण्यात बचाव पथकाला यश आलं आहे.

मच्छू नदीवरील पूल कोसळल्यावर लगेच तिन्ही सैन्य दलांचे बचाव पथकं घटनास्थळी पोहोचले. जवळपास २०० जवानांकडून हे बचाव कार्य राबवलं जात आहे, अशी माहिती गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी दिली आहे. अग्निशमन दलाची सात पथकं, राज्य मदत दलाच्या तीन पथकांसह एनडीआरएफच्या दोन पथकांकडूनही पीडितांचा शोध घेण्यात येत आहे.

https://twitter.com/ANI/status/1586894930525716480?s=20&t=CX2kFHPoi9Bh0wRlD8bt8A

अधिक माहिती अशी कि, या दुर्घटनेत मृतांमध्ये महिला, लहान मुलं आणि वृद्धांचा सर्वाधिक समावेश आहे. दरम्यान, या घटनेच्या तपासासाठी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी उच्च स्तरीय समितीची स्थापना केली आहे. मोरबीतील दुर्घनाग्रस्त पूल सहा महिने नूतनीकरणासाठी बंद होता. एका खासगी कंत्राटदाराने डागडुजी केल्यानंतर गुजराती नववर्षदिनी, २६ ऑक्टोबरला पूल पुन्हा खुला करण्यात आला होता. हा पूल वापरायोग्य असल्याचे प्रमाणपत्र पालिकेने दिले नव्हते, अशी माहिती आता समोर येत आहे.