savada news-जळगाव लाईव्ह न्यूज । दिपक श्रावगे । राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे नुकतेच जिल्ह्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी विविध ठिकाणी भेट दिली दरम्यान, सावदा येथे देखील भेट दिली. यावेळी ‘lumpy skin’ या आजारामुळे अनेक शेतकऱ्यांचे पशु दगावले असून आर्थिक मदत मिळावी. तसेच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना शासकीय औषधी पुरवठा न करता पैसे देण्याची मागणी केली असता शासन दरबारी मदतीसाठी अधिवेशनात आपली मागणी मान्य करून घेईल व आपणास मदत देण्याचे प्रयत्न करेल असे त्यांनी यावेळी सांगितले.
राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे काल गुरुवारी जिल्ह्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी विविध ठिकाणी भेट देऊन जिल्ह्यातील परिस्थिती जाणून घेतली. यावेळी त्यांनी सावदा येथे देखील भेट दिली. दरम्यान, सावदा परिसरातील मस्कावद व खिरोदा येथे गुरांचा पाहणी करताना मस्कावद येथे काही पशुधनमालकांची बैल हे 60 ते 70 हजार रुपयांची घेतलेली असून ती ‘lumpy skin’ या आजारामुळे दगावली आहे. त्यामुळे शासनाकडून आर्थिक मदत मिळावी यासाठी यावेळी भाजपा पदाधिकाऱ्यांतर्फे त्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष जे के भारंबे, संतोष परदेशी, मस्कावत येथील सरपंच भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.
दौऱ्यात मंत्री राधा वि कृष्ण विखे पाटील यांच्यासोबत खासदार रक्षा खडसे, खासदार उमेश पाटील, आमदार राजू मामा भोळे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष नंदू महाजन, श्रीकांत महाजन व भाजपचे इतर पदाधिकारी होते. खिरोदा येथे रावेर मतदार संघाचे आमदार शिरीष चौधरी, धनंजय शिरीष चौधरी व तुकाराम बोरोले यांनी पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन जनता शिक्षण मंडळाच्या गेट जवळ स्वागत केले व पुढे खिरोदा गावात नागरिकांनी जमवून ठेवलेल्या लंबी ग्रस्त पशुधनाची पाहणी करण्याकरता रवाना झाले.