कृषी उत्पन्न बाजार समितीत लाखोंची उलाढाल ठप्प, म्हशी विक्रीस परवानगीची मागणी!
जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑगस्ट २०२२ । जिल्ह्यासह ग्रामीण भागात गुरांवर ‘लंपी स्किन’ या रोगाचे संकट आल्यामुळे शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यासह सावदा येथील गुरांचे बाजार बंद ठेवण्यात आले आहेत. तसेच गुरांवर लसीकरण सुरू असून सावदा परीसरात काही प्रमाणात लंपी आटोक्यात आला आहे. परिणामी कृषी उत्पन्न बाजार समितीत लाखोंची उलाढाल ठप्प झाली आहे. येथे परराज्यातून मोठ्या प्रमाणात म्हशी खरेदी विक्री साठी येत असतात, लंपी हा गाय व बैलावर येत असून म्हशीवर याचा प्रादुर्भाव नाही. त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत म्हशी विक्रीस परवानगी मिळावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
जिल्ह्यासह सावदा व परिरात मागील महिन्यात ‘लंपी स्किन’ हा रोग अनेकांच्या पशुधनास लागण होऊन काहींची गुरे दगावली, त्यांनतर शासनाने त्वरीत लक्ष देऊन लसीकरण सुरू केले तसेच गुरांचे बाजारपेठ बंद ठेवण्याचे निर्देश दिले. त्यानुसार येथील बाजार बंद असून परिणामी कृषी उत्पन्न बाजार समितीत भरणार गुरांचा बाजार बंद असल्याने दर आठवड्यास सुमारे 50 ते 60 लाखांचे नुकसान होत आहे. गुरांवर अद्यापही लसीकरण सूर असून काही प्रमाणात लंपी आटोक्यात आला आहे. व लागण झाली आहे अशी गुरे लस दिल्यावर व औषध उपचारानंतर सुधारित आहे.
येथे परराज्यातून मोठ्या प्रमाणात म्हशी खरेदी विक्री साठी येत असतात, लंपी हा गाय व बैलावर येत असून म्हशीवर याचा प्रादुर्भाव नाही. त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत म्हशी विक्रीस परवानगी मिळावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.