---Advertisement---
बोदवड

Lumpy Skin : बोदवडला जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांनी केली लंपीग्रस्त जनावरांची पाहणी!

---Advertisement---

Bodvad news-जळगाव लाईव्ह न्यूज । १४ सप्टेंबर २०२२ । जिल्ह्यासह ग्रामीण भागात ‘Lumpy Skin’ या संसर्गजन्य रोगाने थैमान घातला असून अनेक शेतकऱ्यांचे पशु मृत्यू झाले आहे. बोदवड तालुक्यात लंपीग्रस्त गुरांच्या पाहणीसाठी मंगळवारी रोजी दुपारी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांनी आपल्या पथकासह भेट दिली. यावेळी तालुक्यातील बोदवड, नाडगाव, कोल्हाडी, आमदगाव व हिंगणे या गावांत लंपीग्रस्त जनावरांची पाहणी केली.

jalgaon

बोदवड येथील विनोद नारायण खेवलकर यांच्या लंपीग्रस्त गाईवर उपचार केले, योग्य त्या मार्गदर्शक सूचनाही केल्या. तालुक्यात एकूण २३ हजार गुरे असून त्यापैकी आतापर्यंत १३ हजार जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. १० हजार जनावरांचे लसीकरण बाकी आहे. त्यांच्यासाठी मंगळवारी जिल्हा स्तरावरून आठ हजार लसींचा साठा तालुक्यास उपलब्ध झाला. त्यामुळे उर्वरित गुरांचेही लसीकरणही लवकरात लसीकरणाचे काम लवकर पूर्ण करण्यात येणार आहे. तालुक्यात एकूण १५० जनावरांना लम्पी आजाराची लागण झाली असून ६ जनावरांचा मृत्यू झाला आहे.

---Advertisement---

मंगळवारी दुपारी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ शामकांत पाटील, चिकित्सालयाचे सहाय्यक आयुक्त डॉ. मनीष बावस्कर,पुणे आरोग्य विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ.एच.डी.चौधरी, व पशुरोग नियंत्रण विभाग पुणे येथील डॉ स्नेहल लहाने यांनी प्रत्यक्ष जनावरांची पाहणी केली. यावेळी उपस्थित पशुपालक व पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना लसीकरणाचे काम लवकर पूर्ण करण्यात यावे अश्या सूचना केल्या.उपायुक्तांनी एणगाव,जामठी या पशुवैद्यकीय दवाखान्यात दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तालुक्यात कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे आहे त्या कर्मचाऱ्यांची तारांबळ उडत आहे. या करिता जर शासकीय यंत्रणेने तालुक्यातील पशुधन पर्यवेक्षकांना या मोहिमेत सहभागी करून घेतले. तर हा साथ रोग लवकर आटोक्यात येऊ शकेल.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---